सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हाशिवरे येथे पाककला स्पर्धा
पाककला स्पर्धेत १२५ महिलांचा सहभाग
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या 70 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ना. आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय हाशिवरे येथे रविवार दि.२० जुलै रोजी पाककला स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते.अलिबाग तालुक्यातील महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने तसेच अलिबाग मुरुड विधानसभेचे अध्यक्ष अमित नाईक यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
रायगड जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा उमा मुंढे आणि अमित नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या पाककला स्पर्धा प्रवेशशुल्काविना होती.या पाककला स्पर्धेसाठी १२५ महिलांनी सहभाग घेतला होता. सहभागी झालेल्या महिलांनी विविध पाककृती तयार केल्या होत्या.स्पर्धेतील पहिल्या चार विजेत्यांना अनुक्रमे 8 हजार रूपये, 5 हजार रूपये, 3 हजार रूपये आणि 2 हजार रूपये अशी रोख रक्कमेसह प्रमाणपत्र मान्यवरांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.सहभागीसर्व स्पर्धकांना भेटवस्तू देण्यातआली.त्याचबरोबर मुरुड विधानसभेचे अध्यक्ष अमित नाईक यांनी स्वखर्चाने उत्तम पदार्थ बनवलेल्या १४ महिलांना त्यांच्या हस्ते पारितोषिक दिले. दरवर्षीप्रमाणे महिलांनी या पाककला स्पर्धेस उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.महिलांनी बनवलेल्या पदार्थांना बाजारपेठ मिळावी व त्यांना स्वयंरोजगार मिळावा या उदात्त हेतूने आम्ही पाककला स्पर्धा भरवत असल्याचे प्रतिपादन महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा उमा मुंढे यांनी केले. ,अलिबाग मुरुड विधानसभेचे अध्यक्ष अमित नाईक,युवती अध्यक्ष मुस्कान ताई , जिल्हा सरचिटणीस मानसी चेऊलकर,तालुका अध्यक्ष आरती मोकल,शहर अध्यक्ष मेघना भोईर उपस्थित होत्या.