विद्यार्थ्यांमध्ये गुरुबद्दल आदर निर्माण करा: महापौर राखीताई संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन

विद्यार्थ्यांमध्ये गुरुबद्दल आदर निर्माण करा: महापौर राखीताई संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन

नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाची शैक्षणिक कार्यशाळा

विद्यार्थ्यांमध्ये गुरुबद्दल आदर निर्माण करा: महापौर राखीताई संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन
विद्यार्थ्यांमध्ये गुरुबद्दल आदर निर्माण करा: महापौर राखीताई संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन

✍️संतोष मेश्राम✍️
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

चंद्रपूर :- खालील वृत्त या प्रमाणे आहे पूर्वी गुरुजींबद्दल आदर होता. आता थ्री-जी आणि फोर-जीच विद्यार्थांचा गुरु बनलाय. शिक्षकांनी विद्यार्थामध्ये गुरूबद्दल आदर निर्माण करावा, असे प्रतिपादन महापौर राखीताई संजय कंचर्लावार यांनी केले.

महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघ, शाखा महानगरपालिका चंद्रपूरच्या वतीने राणी हिराई सभागृह, नवीन प्रशासकीय भवन येथेआयोजित शैक्षणिक कार्यशाळेत बोलत होत्या. यावेळी मंचावर महाराष्ट्र नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाचे राज्यध्यक्ष अर्जुन कोळी, सुभाष कोल्हे, सुनील खेलूरकर, अरुण पवार, साधना साळुंखे, मनपाचे शिक्षण प्रशासन अधिकारी नागेश नीत यांची उपस्थिती होती.

यावेळी महापौर राखीताई संजय कंचर्लावार म्हणाल्या, कोविड काळात विद्यार्थांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी पोषण आहारावर भर देण्याची गरज आहे. आज कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण द्यावे लागत आहे. मात्र, चंद्रपूर मनपाच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षण दिले. म्हणूनच मनपाच्या शिक्षकाचे कौतुक करावेसे वाटते. घरी जरी आई पहिली गुरु असली, तरी विद्यार्थ्यांचे जीवन अधिक समृद्ध करणयासाठी आणि त्यांना घडविण्याचे मोठे काम शिक्षक करीत असतात, त्यामुळे मी सर्वाना मनापासून सॅल्यूट करते.