विक्रोळी जागतिक जेष्ठ नागरीक दिवसाचे औचित्य साधून जेष्ठ नागरिक मोफत कार्ड वाटप

✒आसिफ तैय्यब शेख✒
मुंबई प्रतिनिधी
9324470108
मुंबई:- जागतिक जेष्ठ नागरीक दिवसाचे औचित्य साधून आज दिनांक 21 ऑगस्टला महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबईचे अध्यक्ष नवाब मलिक व ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री धनंजय दादा पिसाळ ह्यांचं मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विक्रोळी तालुक्याचा वतीने विक्रोळी तालुक्यातील जेष्ठ नागरिकांना “मोफत जेष्ठ नागरिक कार्ड” चे वाटप करण्यात आले. ह्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई सचिव व विक्रोळी तालुका निरीक्षक श्री राजू घुगे उपस्थित होते. तसेच ह्या कार्यक्रमाला विक्रोळी तालुक्यातील जेष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. अनेक जेष्ठ नागरिकांना मोफत नागरीक कार्ड देण्यात आले.

विक्रोळी जागतिक जेष्ठ नागरीक दिवसाचे औचित्य साधून जेष्ठ नागरिक मोफत कार्ड वाटप

ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ईशान्य मुंबई जिल्हा पदाधिकारी श्री महेंद्र मगरे, श्री आदेश बनसोडे, श्री सचिन मोरे तालुका पदाधीकारी श्री विजय येवले, श्री रिहान शेख, श्री सुलतान शेख, श्री प्रशांत मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे विक्रोळी तालुका अध्यक्ष श्री नियाज शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विक्रोळी तालुका उपाध्यक्ष श्री रुपेश मोहिते, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे वॉर्ड अध्यक्ष ११९ श्री भुवन जैन, महिला पद्धधिकारी आयेशा आपा नसीमा आपा आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पद्धधिकारी ह्यांचे मनःपूर्वक आभार अब्दुल रेहमान अन्सारी विक्रोळी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी मानले.