नागपूर, वेश्या व्यवसायासाठी प्रसिद्ध गंगा जमुना रेड लाईट वस्तीत वाद पेटला.
नागपूर, वेश्या व्यवसायासाठी प्रसिद्ध गंगा जमुना रेड लाईट वस्तीत वाद पेटला.

नागपूर, वेश्या व्यवसायासाठी प्रसिद्ध गंगा जमुना रेड लाईट वस्तीत वाद पेटला.

नागपूर, वेश्या व्यवसायासाठी प्रसिद्ध गंगा जमुना रेड लाईट वस्तीत वाद पेटला.
नागपूर, वेश्या व्यवसायासाठी प्रसिद्ध गंगा जमुना रेड लाईट वस्तीत वाद पेटला.

✒️युवराज मेश्राम✒️
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9527526914
नागपूर:- नागपूरमधील प्रसिद्ध रेड लाईट एरीया असलेल्या गंगा जमुना वस्तीत मोठ्या प्रमाणात वाद पेटलाय. गंगा जमुना हा नागपूरमधला वेश्या व्यवसायासाथी प्रसिद्ध एरिया आहे. या एरियावर पोलिसांनी कारवाई केलीय. ही वस्ती पोलिसांनी अवैध धंद्यांचं कारण देत सील केलीय. मात्र ही वस्ती सुरू करू नये अशी स्थानिक नागरिकांची आणि पोलिसांची मागणी आहे.

काही दिवसा अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विदर्भ तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये वारंगणांनी हा एरियात व्यवसाय सुरु करण्यासाठी आंदोलन केले होत. गंगा जमुना या रेड लाईट वस्तीत अल्पवयीन मुलीचे देहव्यापार होत असल्याचं समोर आलं आहे. यासह अनेक अवैध धंदे तुम्ही येथे चालतात. सोबतच अमली पदार्थांची विक्री चालते या कारणामुळे पोलिसांनी गंगा जमुना वस्ती सील केली आहे.

स्थानिक नागरिकांचा इथे चालत असलेल्या बेकायदेशीर व्यवहारांना विरोध आहे. त्यामुळे ते पोलिसांच्या कारवाईचा समर्थन करत आहेत. बाजूला वारंगणा ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वात वस्ती पुन्हा खुली करण्यासाठी आंदोलन करत आहेत. आज वारांगणांनी ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वात गंगा जमुना परिसरात रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

राखी बांधून या महिलांच्या रक्षणासाठी भाऊ म्हणून उभी राहील अशी भूमिका ज्वाला धोटे यांनी जाहीर केली, यापूर्वी त्यांचे वडील कै. जांबुवंतराव धोटे हे सुद्धा या गंगा जमुना येथील महिलांच्या हातानी राखी बांधत असत.

दुसरीकडे स्थानिक नागरिक आणि नगरसेवक यांच्या माध्यमातून पोलिसांच्या कारवाईला समर्थन देत या वस्तीत चालणाऱ्या देहव्यापाराला विरोध करण्यासाठी धरणे आंदोलन करत आहे. आज दोन्ही गट समोरासमोर आल्याने जोरदार घोषणाबाजी आणि धक्काबुक्की सदृश स्थिती निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here