मूत्रपिंडाच्या शस्त्रक्रियेसाठी गोडपिपरी शहरातील मजुराकडून समाजापुढे मदतीची हाक

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोडपिपरी:- शहरातील आझद हिंद चौक परिसरात वास्तव्यास असणाऱ्या किशोर लटारे वय 40 वर्ष या मजूर काम करणाऱ्या मजुराला मूत्रपिंडाच्या दुर्धर आजाराने ग्रासले असून दारिद्रयरेषेखाली जीवन जगणाऱ्या किशोरला खाजगी इस्पितळात शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांनी एक लाख रुपयांचा खर्च सांगितला असून घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे किशोर लटारे व त्याच्या कुटुंबीयांनी समाजापुढे सोशल मीडियातून मदतीची हाक दिली आहे.
शहरातील किशोर लटारे नामक युवक याने मोटर सायकल दुरुस्ती या उपजीविकेच्या मजुरीवर आज वर कुटुंबाचा गाडा हाकला. तत्पूर्वी त्याचा विवाह सुशीला नामक युतीची होऊन किशोरला रोहित व विद्या नावाची दोन मुले आहेत. आई-वडिलांचा सांभाळ सोबतच आपल्या कुटुंबाचाही सांभाळ करीत मोटर सायकल दुरुस्ती यातून तो कसा आपले व आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करीत होता. मात्र गरिबाच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न या म्हणीप्रमाणे नियतीनेच घडविले. अतिशय आनंदी जगणाऱ्या किशोरला मूत्रपिंडाच्या दुर्धर आजाराने ग्रासले. दारिद्र रेषेखालील जीवन जगण्याला किशोरने सरकारी रुग्णालयांची उंबरठे झिजविले .मात्र आजारावर योग्य उपचार मिळत नसल्याने प्रकृती आणखी खालावत गेली. अशातच शेजारी राहणाऱ्या पंचायत समिती गोंडपिपरी चे माजी उपसभापती रामचंद्र कुरवटकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत किशोर लटारे व कुटुंबियांना आधार देत स्वखर्चातून किशोरच्या दुर्धर आजाराचे निदान करण्यासाठी नागपूर येथील खाजगी इस्पितळात पाठविले. यावर डॉक्टरांनी विविध चाचण्या करून किशोरच्या मूत्रपिंडाला दुर्धर आजाराने ग्रासले आहे. असे निदान देत शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. या शस्त्रक्रियेसाठी एक लाखाहून अधिक चा खर्च असल्याचेही डॉक्टरांनी किशोर व त्याच्या कुटुंबीयांना सांगितले. घरी अठराविश्व दारिद्र्य दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या किशोर लटारे व त्याच्या कुटुंबीयांना समोर एक लक्ष रुपी अवाढव्य असा मोठा यक्ष प्रश्न उभा असल्याने मदत मागायची कुठून हे कळेनासे झाले. यामुळे त्यांनी हतबल होऊन डॉक्टरांना वेळ मागत किशोरला घरी परत आणले. किशोर ची पत्नी सुशीला ही सध्या मजूर काम करून मुलाबाळांसह पती किशोरची सध्या देखभाल करत आहे. ही बात काही तरुणांना माहिती होताच त्यांनी लगेच सोशल मीडियातून इतर सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या दानशूरांना मदतीचे आवाहन करीत किशोर च्या मूत्रपिंडाच्या शस्त्रक्रियेसाठी धडपड चालवली असून शेजारधर्म बांधिलकी जोपासत माजी उपसभापती रामचंद्र कुरवटकर यांनी किशोरच्या शस्त्रक्रिया साठी सहभाग दर्शविला आहे. तसेच समाजातील इतरही मंडळींनी आजार ग्रस्त किशोरला मदत करावी असे आवाहन किशोरच्या कुटुंबीयांनी केले आहे.