*ग्रामपंचायत इमारतीचा वापर विकासासाठी करा*
*- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत*
*चरवेली आणि कोळंबे ग्रामपंचायत इमारतींचे लोकार्पण*

*- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत*
*चरवेली आणि कोळंबे ग्रामपंचायत इमारतींचे लोकार्पण*
✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961
रत्नागिरी : – ग्रामपंचायत इमारतीचा वापर विकासात्मक दृष्ट्या काम करण्यासाठी झाला पाहिजे तसेच कामासाठी येथे येणारा प्रत्येक नागरिक येथून समाधानी होऊन जाईल अशी अपेक्षा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.
चरवेली ग्रामपंचायतच्या नूतन इमारतीचे लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप,समाज कल्याण सभापती परशुराम कदम, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, रत्नागिरीचे प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, चरवेलीचे सरपंच सुरेश सावंत, उपसरपंच गजानन नागले आदी मान्यवर उपस्थित होते.
सामंत म्हणाले या नूतन इमारतीचे उपयोग विकासात्मक दृष्ट्या काम करण्यासाठी करा. येथील विकास कामे करण्यासाठी आपण कटिबद्ध असून या इमारतीमध्ये सभागृहासाठी पुढच्या वर्षी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
चरवेली गाव मुंबई-गोवा महामार्गावर वर असल्याने त्याला वेगळे महत्त्व आले आहे. महामार्गाचे काम पूर्ण होताच या ठिकाणी फूडमॉल उभारून त्या फूडमॉल च्या माध्यमातून येथील तरुण-तरुणींसाठी रोजगार निर्मिती केली जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी इमारतीसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या प्रदीप सावंत व शशिकांत सावंत यांचा सत्कारही मंत्रीमहोदयांच्या हस्ते करण्यात आला. चरवेली येथील नागरिक मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.
*ग्रामपंचायत कोळंबे च्या नूतन इमारतीचे लोकार्पण सोहळा संपन्न*
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज ग्रामपंचायत कोळंबे ता.संगमेश्वर च्या नूतन इमारतीचे लोकार्पण सोहळा संपन्न झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, जिल्हा परिषद सदस्य माधवी गीते पंचायत समिती सदस्या पाटणे, संगमेश्वर पंचायत समिती सभापती माने, राजेंद्र महाडिक, प्रमोद पवार, प्रांतधिकारी विकास सूर्यवंशी, गटविकास अधिकारी रेवणकर , ग्रामपंचायत कोळंबे चे सरपंच रघुनाथ पडवळ आदी मान्यवर उपस्थित होते.
सामंत म्हणाले या सुसज्ज इमारती मध्ये येणारा येथील प्रत्येक ग्रामस्थ त्याचं काम झालं म्हणून समाधानी व्हावा. असे काम करा.