राष्ट्रीय कृषि प्रदर्शनी नंदापुर येथे संपन्न.

✒युवराज मेश्राम✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपुर:- 20 ऑगस्ट शुक्रवार ला मौजा नंदापुर तालुका सावनेर येथे भारत सरकार, कृषिमंत्रालय अंतर्गत केंद्रीय कीड प्रबंधन संस्थान, नागपुर व्दारा राष्ट्रीय कृषि प्रर्दशनीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनीचे उदघाटन श्री.गुणवंत चौधरी सभापती कृषि उत्पत्र बाजार समीती सावनेर यांचे हस्ते संपंत्र झाले तर प्रमुख पाहुणे म्हणुन श्री. प्रकाशजी पराते उपसभापती पं.स.सावनेर, श्री. गणेश काकडे पं.स.सदस्य, श्री. मनोज बन्सोड सरपंच नंदापुर हे उपस्थित होते तर श्री. कुसळकर उपविभागीय कृषि अधिकारी, नागपुर , डॉ.ए.के.बोहरीया डेप्युटी डारेक्टर सीआयपीएम नागपुर, श्री.मनीष बोंडे, श्री.कोल्हे कीटकशास्त्रज्ञ, कु. राठोड मंडळ कृषि अधिकारी खापा, श्री.रोशन डंभारे, कु. सुरकर यांनी उपस्थित राहुन शेतकरयांना कृषि प्रदर्शनी मध्ये विविध पिकांवरील कीडी, रोग, प्रक्रीया उदयोग सेद्रिय शेती, कीडींचे जिवणचक्र इ. मॉडेल्स येथे उभारले होते यातुन शेतकरयांना कृषि विभागाव्दारे मार्गदर्शन करण्यात आले. ही प्रदर्शनी बघण्यास तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थीत होते.