मुंबई, पोलीसांनी पोलीसालाच ठोकल्या बेड्या, पोलीस हवालदाराकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग.

मुंबई, पोलीसांनी पोलीसालाच ठोकल्या बेड्या, पोलीस हवालदाराकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग.

मुंबई, पोलीसांनी पोलीसालाच ठोकल्या बेड्या, पोलीस हवालदाराकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग.
मुंबई, पोलीसांनी पोलीसालाच ठोकल्या बेड्या, पोलीस हवालदाराकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग.

✒️नीलम खरात✒️
मुंबई महानगर प्रतिनिधी
मुंबई:- मुंबईच्या डोंबिवलीतून एक संतापजनक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. जेव्हा रक्षक पोलीसच मुळी शोषण करत असेल तर पुढे विचार करण निर्थक होते. डोंबिवली येथील एका पोलीस कर्मचाऱ्यानेच अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीला पोलिसांनी कल्याण कोर्टात हजर केलं. त्यावेळी कोर्टाने त्याची रवानगी जेलमध्ये केली. या प्रकारानंतर कल्याण पोलीस उपायुक्तांनी आरोपी पोलिसावरप निलंबनाची कारवाई केली.

काय आहे घटना…
डोंबिवलीत येथील रामनगर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेला आरोपी पोलीस हवालदार सध्या जेलमध्ये आहे. त्याच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या पोलीस स्टेशनमध्ये आरोपी पोलीस कार्यरत होता त्याच पोलीस स्टेशनमध्ये त्याला अटक झाली आहे.

विनयभंगाचा आरोप….
डोंबिवलीत राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीने तिच्या इमारतीत राहणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्याच्या विरोधात छेडछाड केल्याचा आरोप लावला. त्या मुळीने ही सगळी बाब तिच्या कुटुंबियांना सांगितली. मुळीचा आरोप आहे की पोलिस कर्मचाऱ्याने जिना चढताना तिच्यासोबत गैरवर्तन केले. या प्रकरणी डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांनी 354 कलमांतर्गत गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.

आरोपी पोलीस हा रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होता. याबाबत रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांनी सांगितले की, तक्रार आल्यावर आम्ही त्याला अटक करुन, त्याला न्यायालयासमोर हजर केले. न्यायालायने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, कल्याण पोलीस उपायुक्तांनी आरोपी पोलिसाविरोधात निलंबनाची कारवाई केली आहे. या घटनेमुळे कल्याण डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे.