*पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी-डॉ.मंगेश गुलवाडे*
*भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हा चंद्रपूर पर्यावरण समिती कार्यकारणीची बैठक संपन्न*

*भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हा चंद्रपूर पर्यावरण समिती कार्यकारणीची बैठक संपन्न*
मनोज खोब्रागडे
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
8208166961
चंद्रपूर : -भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरात विविध आघाडी,मोर्चे,सेल व प्रकोष्ठ तसेच पक्षसंघटनेच्या विस्तारासाठी समित्या तयार करण्यात आलेल्या आहेत त्यातीलच महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात पर्यावरणाच्या रक्षणासाठी पर्यावरण समिती तयार करण्यात आली आहे आज डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालय येथे कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांनची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे बोलत होते त्यांनी यावेळी सांगितले की पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी सर्वांनी एकत्रीत प्रयत्न करायला हवे असे त्यांनी यावेळी सांगितले त्यानंतर पर्यावरण सामितीच्या अध्यक्षा प्रीती भुषणवार यांनी मनोगत व्यक्त करतांना समितीच्या पदाधिकाऱ्यांना वेगवेगळी जबाबदारी समजावून सांगितली व पर्यावरणाच्या रक्षणासाठी एकत्रित प्रयत्न करणार असल्याचे बोलून दाखविले व समितीच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले.आतापर्यंत पर्यावरण समितीच्या अध्यक्षा प्रीती भुषणवार यांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले व ते यशस्वीसुद्धा झाले यानंतर ही असेच उपक्रम राबविण्याचा समितीचा मानस आहे.यावेळी सांगितले सदर बैठकीत
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार,भाजपा उपाध्यक्ष अरुण तिखे , पर्यावरण समितीचे उपाध्यक्ष प्रतीक तिवारी, सचिव अविनाश उत्तरवार, सहसचिव निलेश चकनलवार, महामंत्री अमित कासनगोट्टूवार , सदस्य भाग्यश्री आपरेटवार ,रामचंद्र डोंगरवार, श्रीनिवास खोंड, सौरभ डोंगरे, प्रणव भूषणवार ,दत्तात्रय पुरोहित, परीक्षित तिवारी, अमीन जिवानी,सुमित तिवारी इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती.