रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या नात्याला अस्मित प्रेमाचे बंधन!
✒️प्रशांत जगताप✒️
कार्यकारी संपादक
9766445348
रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या नात्याला अस्मित प्रेमाचे बंधन! या पवित्र दिनी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून बहिण भावाच्या नात्याला हृदयात प्रेमाने जिंकून घेते. रक्षाबंधन हा सण म्हणजे प्रेम, आपुलकी, नात्याची जाणीव आणि प्रेमाच नितळ आणि निखळ नातं जपण्याचा क्षण होय. निसर्गातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते. भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे. भारतीय संस्कृती मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन घडविणारी संस्कृती आहे. स्त्रीला भोगवस्तू न समजता तिची पूजा करणारी संस्कृती आहे.
पण आज देशात मोठ्या प्रमाणात महिलेवर अत्याचार वाढलेले आहे. आज बलात्कारच्या दुर्दैवी घटना पाहुण देशात महिला सुरक्षित आहे की नाही याची प्रचिती येते. एकीकडे आपण महिलाना देवीची उपमा देतो आणि दुसरीकडे त्याच्यावरच अत्याचार होतो हे किती दुर्दैवी बाब आहे.
आज भारतातील महिला ज्या महापुरुषानी तिच्या नशिबी आलेल “मुल आणि चूल” यांच ग्रहण सोडवल त्याच्या विचाराला पार विसरुन गेल्या. सावित्रीबाई फुले शीकली आणि तिने एक नव समाजा जन्म दिला. महिलांना शिक्षण रुपी पान्हा पाजला. त्यामुळे आज महिला वर्गाचि स्थिती, परिस्थिती, शिक्षण, स्वातंत्र्य आणि प्रत्येक क्षेत्रात स्त्री समोर दिसुन येत आहे व पुरुषाच्या बरोबरीने कार्य करत आहे.
या रक्षाबंधनच्या दिवशी ज्या लोकांनी स्त्रीयाच्या उधारासाठी कार्य केल त्याना वंदन करुन मग रक्षाबंधनाचा सण म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण! बहिणीने हातावर राखी बांधताच भावाची दृष्टी बदलते. राखी बांधणार्या बहिणीकडे तो विकृत नजरेने पाहत नाही. समाजात आपली बहिण ताठ मानेने वागावी म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःकडे घेतो. मात्र आज तिची मस्करी करणार्या आणि जनावरांप्रमाणे वागणूक देणार्या भावांना समजावून सांगण्याची गरज आहे.
बहिण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हे केवळ भावाच्या कपाळाची पूजा करण्यासाठी नव्हे तर त्याचे विचार आणि बुद्धीवरील विश्वासाचे दर्शन आहे. भावाच्या कपाळावर टिळा लावताना सामान्य वाटणार्या या क्रियेत दृष्टी परिवर्तनाच्या महान प्रक्रियेचा समावेश आहे. सामान्य दृष्टीने जगाकडे पाहणार्या नजरेशिवाय भावनात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी एक पवित्र तिसरा डोळा बहिणी आपल्या भावाला देऊन त्रिलोचन बनविते, असा संकेत या क्रियेमध्ये दिसून येतो.