राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कळमेश्वर तालुका व शहर यांची आढावा बैठक संपन्न.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कळमेश्वर तालुका व शहर यांची आढावा बैठक संपन्न.

वन्यजीव-मानव संघर्ष कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करा – पालकमंत्री वडेट्टीवार* *प्रत्येक गावातील तरुणांना प्रशिक्षित करण्याचे निर्देश* *इको टूरिझम’ अंतर्गत विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक*

युवराज मेश्राम✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
कळमेश्वर:- येथील केटीएम सभागृहामध्ये राष्ट्रवादीच्या वतीने कळमेश्वर तालुका व शहर यांची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी ईश्वराची बाळबुधे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ओबीसी त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेश सचिव अविनाश गोतमारे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबा गुजर, जिल्हा महिला अध्यक्ष अर्चनाताई हरडे तसेच जिल्ह्याचे सरचिटणीस युवराज मेश्राम, तालुका अध्यक्ष भोजनकर, शहर तालुका अध्यक्ष बबन वानखेडे, जिल्हा कोषाध्यक्ष जीवन बागडे, माजी नगराध्यक्ष फत्तेसिंग मराठवाडा, ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर श्रीखंडे, कळमेश्वर तालुका महिला अध्यक्ष मायाताई गणोरकर, किसान सेलचे तालुकाध्यक्ष दिवाकर कडू, तालुका समन्वय अध्यक्ष श्रीराम भिवगडे प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी कळमेश्वर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा आढावा घेण्यात आला व शहर मधील सुद्धा कार्यकर्त्यांची आढावा व कार्यकारणी संदर्भात माहिती देण्यात आली. त्याच प्रमाणे राष्ट्रवादीमध्ये जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टी वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रवेश घेण्यात आला यामध्ये दुर्गासदाजी लभाने, सोनालीताई मनीष शेंडे, मुरलीधर बंडूभाऊ शेंडे, गौरीताई डोंगरे, नंदूजी वराडे, गोपाल तिडके, असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यात आला. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या वतीने त्यांना नियुक्तीपत्र आणि सन्मान करण्यात आला. नंदू वराडे उपाध्यक्ष कळमेश्वर तालुका, भीमरावजी इंगळे संघटन सचिव, विलास गोडसे कार्यालय सचिव, मुरलीधर बारावी तालुका सरचिटणीस, दुर्गादास तभाने तालुका उपाध्यक्ष, सुरेश नवले तालुका उपाध्यक्ष, बंडू शेंडे संघटन सचिव, मनीष शेंडे संघटन सचिव, भोजराज लोंढे तालुका उपाध्यक्ष, विनोद भोयर तालुका मोहपा शहराध्यक्ष, शंकर चिमोटे व महिला अध्यक्ष मायाताई गणोरकर सरचिटणीस संतोष झाडे उपाध्यक्ष शरद डोके तालुका महिला आघाडी सरचिटणीस सरचिटणीस वैशाली ठाकरे संदीप मोहोळ तेलकामठी सर्कल प्रमुख यामध्ये 70 लोकांची कार्यकारिणी गठित करण्यात आली असून या कार्यक्रमाला तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमास जिल्हा अध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेबांचे विचार घराघरांमध्ये पोचवावे असे मार्गदर्शन बाबा गुजर यांनी केले. व ईश्वरभाऊ बाळबुधे व अविनाश गोतमारे गोतमारे, अर्चना हरडे यांनी तालुक्यातील नवीन कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष भुजंग मुजनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन जीवन बागडे यांनी केले.