आरटीई प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी अद्यापही ‘वेटिंग’वर; प्रवेश प्रक्रियेत प्रतीक्षा

आरटीई प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी अद्यापही ‘वेटिंग’वर; प्रवेश प्रक्रियेत प्रतीक्षा

आरटीई प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी अद्यापही ‘वेटिंग’वर; प्रवेश प्रक्रियेत प्रतीक्षा
आरटीई प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी अद्यापही ‘वेटिंग’वर; प्रवेश प्रक्रियेत प्रतीक्षा

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
 वर्धा/ हिंगनघाट,22 ऑगस्ट:- शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्यापही रखडलेल्या अवस्थेत आहेत. पहिल्या यादीतील प्रवेश प्रक्रिया होऊन वीसहुन अधिक दिवस झाले, तरी उर्वरित रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत कोणत्याही सूचना शालेय शिक्षण विभागाकडून न मिळाल्याने पालक हवालदिल झाले आहेत.

आरटीईनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमधील २५ टक्के जागांवर प्रवेश मिळावा, यासाठी दरवर्षी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता एप्रिलमध्ये प्रवेशाची ऑनलाइन सोडत (लॉटरी) काढण्यात आली. परंतु त्यानंतर राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेल्या निर्बंधामुळे लॉटरीनंतरही प्रवेश प्रक्रियेचे कामकाज रखडले. जूनमध्ये लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर ११ जूनपासून ही प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली. दरम्यान पहिल्या प्रवेश यादीत निवड झालेल्या केवळ ६६ टक्के विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतले आहेत. या यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी जुलैअखेरपर्यंतची मुदत होती. त्यानंतर ऑगस्टच्या सुरवातीपासून शाळांमधील उर्वरित रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणे अपेक्षित आहे. परंतु प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभागाने कोणत्याही सूचना आतापर्यंत जाहीर केलेल्या नाहीत. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना यंदा प्रवेशाची संधी मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.