*तरुणाई जातेय का अंमली पदार्थांच्या जाळ्यात? – राजुरा शहरातही मिळतात अंमली पदार्थ*
*अवैध दारू विक्रेते वळत आहेत अंमली पदार्थ तस्करीकडे*

*अवैध दारू विक्रेते वळत आहेत अंमली पदार्थ तस्करीकडे*
संतोष मेश्राम
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
ग्रामीण 9923497800
चंद्रपूर जिल्हातील दारूबंदी उठल्यानंतर अवैध दारूविक्री करणारे युवक आता अंमली पदार्थ तस्करीच्या कामात लागले आहे. राजुरा शहरातील सोनीया नगर वार्ड, रेल्वे लाईन जवळील झुडपी भागात अंमली पदार्थ विक्रीचा व्यवसाय जोमात सुरू असून अनेक अल्पवयीन युवक या व्यवसायात गुंतले असल्याची चर्चा आहे.
दारूबंदी विरोधक दारू पूर्ववत सुरू झाल्यानंतर अवैध धंदे बंद होतील अशा वल्गना करत होते. त्यांच्या मागणीप्रमाणे दारूविक्री सुरू झाली मात्र आता थेट गांजा, चरस ह्या सारखे अंमली पदार्थ सहजरीत्या उपलब्ध होताना दिसत असुन या सर्व प्रकारकडे अमली पदार्थ प्रतिबंध विभाग व पोलीस प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
शहरातील अनेक युवक दारूबंदी काळात दारू तस्करीच्या व्यवसायात गुंतले होते. मात्र जिल्हातील दारूबंदी हटल्याने त्यांनी नवी शक्कल लढवत अल्पवयीन मुलांना आपल्या जाळ्यात फसवून गांजा विक्रीचा धंदा थाटला आहे असे बोलल्या जाते. सोनीया नगर परिसरातील युवकाकडून गांजा तस्करी केली जात असुन, गांजाची १० ग्रामची पुडी १०० रूपयांमध्ये विकली जात असल्याचे विश्वसनीय माहिती आहे.
रेल्वे लाईनच्या बाजुला असलेल्या झुडपी जंगलाचा फायदा घेत युवकांना येथे अमली पदार्थ पुरविले जात असून तेथे अमली पदार्थ सेवन करण्यासाठी सुविधा ही निर्माण करण्यात आल्या आहे. शहरातील अल्पवयीन व शाळकरी मुलं अमली पदार्थांच्या आहारी जात असून पोलीस प्रशासनाने वेळीच दखल घेवून गांजा तस्करांच्या मुसक्या आवळण्याची मागणी होत आहे. मात्र गुन्हे अन्वेषन शाखेतील कर्मचाऱ्याच्या दुर्लक्षामुळे अथवा इतर काही कृपेने हा व्यवसाय बिनबोभाटपणे सुरू असल्याची परिसरातील नागरिकांत दबक्या आवाजात चर्चा आहे. या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालुन कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.