वर्धा जिल्ह्यात दारु, सट्टा आणि गांजा व्यवसायाला आशीर्वाद कुणाचा?
वर्धा “जिल्हात वाढत आहे गुन्हेगारी” पोलीस प्रशासन सुस्त.

✒मुकेश चौधरी✒
उप संपादक, मिडीया वार्ता न्यूज
7507130263
वर्धा:- गांधीजी आणि विनोबाजी यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या जिल्हात सध्या अवैध दारु तस्करी, खटखट सट्टा, सट्टा, गांजा यांच्या अवैध विक्रीने पावन होत आहे. वर्धा जिल्ह्यात दारु, सट्टा, गांजा व्यवसायाचा पुर आला आहे. यामुळे अनेक घर उधवस्त झाले आहे आणि या अवैध व्यवसायामुळे वर्धा जिल्हात मोठ्या प्रमाणात क्राईम वाढत असून पोलिस कारवाई कमजोर ठरत आहे.
वर्धा जिला पोलिस मुख्यालय, वर्धा सिटी पोलिस स्टेशन, एल.सी.बी कार्यलयाच्या अगदी जवळ पटेल चौक, रेल्वे स्टेशन जवळ, दारु आणि सट्टा व्यवसाय काही भष्ट्र पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या आशिर्वाने खुले आम सुरु आहे. या दारु, सट्टा व्यवसायाला कौनत्या राजकीय पक्षच्या नेत्यांचा आशीर्वाद आहे. हा प्रश्न सध्या वर्धा जिल्ह्यातील जनता विचारत आहे?
वर्धा जिल्ह्यात अवैध दारु माफिया, सट्टा माफिया वर पोलिस विभाग का कार्यवाही करत नाही?
आज वर्धा जिल्हातील हिंगणघाट तालुक्या बरोबर संपूर्ण वर्धा जिल्ह्यात अवैध धंदयाला उत आल्याचे दिसुन येत आहे. त्यात आता दिवसा ढवळ्या बंदुक पण नीघत आहे. आणि चक्क पोलीस कर्मचा-यावरच बंदूक लावण्यात येत आहे. हत्याच्या घटना वाढल्या आहे. अवैध दारु माफियाच्या वर्चस्वाच्या लढाईत अनेक तरुणाच्या हत्या सुरु आहे. वर्धा जिल्हात पोलिसांची भीति आहे की नाही हाच मोठ्या प्रश्न निर्माण झाला आहे?
आज जिल्हात क्राईम वाढत आहे. शैक्षणिक विध्यार्थी, विध्यार्थीनी भयभीत आहे. हिंगणघाट येथील रेल्वे स्टेशन परिसरात, महात्मा फुले वार्ड, काजी वार्ड येथे खुले आम दारुचा महापुर दिसून येत असुन त्याना पोलिसाचा आशीर्वाद आहे का?
समुद्रपुर शहरातील मुख्य बाजार पेठेत खुले आम अवैध दारु, सट्टा व्यवसाय शुरू आहे मात्र पोलिस कारवाई जिरो आहे? त्यामुळे वर्धा जिल्हातील नागरीक अशी मागणी करत आहे की, वर्धा जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी यावर लक्ष देऊन वर्धा आणि गांधी जिल्हाला अवैध धंदावर कारवाई करावी.