माणगाव बस स्टँड शेजारी आढळले मृतावस्थेत अज्ञात व्यक्तीचे प्रेत

दिपक दपके 

माणगाव शहर प्रतिनिधी

मो: 9271723603

माणगाव तालुक्यातील माणगाव एसटी स्टँड शेजारी असलेल्या चौकशी कक्षाच्या उजव्याबाजूला गल्लीमध्ये एक अज्ञात पुरुष जातीचे प्रेत आढळून आले या अज्ञात पुरुषाचे रंग सावळा केस बारीक अर्धवट टक्कल सडपातळ उंची अंदाजे पाच फूट तीन इंच ,लाल रंगाचा टीशर्ट, निळ्या रंगाची हाफ पॅन्ट ,मनगटावर उजव्या बाजूला ओम लिहिलेले असे मृत अवस्थेत आढळून आले असून घटनास्थळी खबर अशोक नारायण जाधव , व्यवसाय/ नोकरी/ एसटी डेपो कंट्रोल राहणार. रामनाथ अलिबाग/ रायगड यांनी माणगाव पोलीस ठाण्यात खबर दिली असता घटनास्थळी माणगाव पोलीस एन एस धनावडे यांनी गुन्हा नोंद करून आकस्मित मृत्यू झाल्याची नोंद करून पुढील तपास माणगाव पोलिस करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here