श्रीवर्धन मध्ये मा. आदिती ताई तटकरे यांच्या तर्फे राष्ट्रवादी महिला कमिटी प्रस्तुत श्रावणसारी नृत्य स्पर्धा उत्सवात पार पडल्या
रशाद करदमे
श्रीवर्धन कोकण प्रतिनिधी
मो: 9075333540
श्रीवर्धन: श्रीवर्धन हे पूर्वी पासुनच ऐतिहासिक शहर प्रसिद्ध आहे या शहरात विविध कलेचे नेहमीच कौतुक केले जाते, दिनांक २१ ऑगस्ट २०२२ रोजी मा. आदिती ताई तटकरे यांच्या सौजन्याने श्रावणसरी भव्य नृत्य स्पर्धा 2022 रायगड जिल्हा राष्ट्रवादि काँग्रेस महिला संघटनेने आयोजित केला होता. स्पर्धे मध्ये विविध गावांमथुन स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाला मानचिन्ह व सात हजार रुपये. द्वितीय क्रमांकाला मानचिन्ह व पाच हजार रुपये तसेच तृतीय क्रमांकाला तीन हजार रुपये व मानचिन्ह आणि दोन उत्तेजनार्थ हजार रुपये व मानचिन्ह असे पारितोषीक ठेवण्यात आले होते. प्रथम क्रमांक नारीशक्ती ग्रुप श्रीवर्धन, द्वितीय क्रमांक नटेश्वरनृतीय ग्रुप श्रीवर्धन व तृतीय क्रमांक नवदुर्गा ग्रुप नवीपेठ. श्रीवर्धन व उत्तेजनार्थ प्रथम स्नेह ग्रुप दिव्याआगर व उत्तेजनाचे द्वितीय ग्रुप जैन ग्रुप श्रीवर्धन व सहभागी कलाकारांनी भेटवस्तु देवून गौरव करण्यात आला या नृत्य स्पर्धे साठी संगीता भक्कम माणगांव तालुका व गिता ताई जाधव माजी राष्ट्रवादी महिला बालकल्याण समिती तळा. तसेच श्रीवर्धन च्या शहर अध्यक्षा राजसी मुरकर, माजी शहर अध्यक्षा प्रविता माने,व माजी नगर सेविका कविता सातनाक व इतर राष्ट्रवादी पदाधिकारी उपस्थित होत्या.
स्पर्धेच्या योग्य निर्णया करिता परीक्षक म्हणून गौरी पोतदार म्हसळा या लाभल्या होत्या. त्यांनी योग्य परीक्षण करून मार्गदर्शन केले.