जुनी पेंशनसाठी 2005 पुर्वीचे अनुकंपा धारकांनी 24 ऑगष्ट रोजी राज्यस्तरीय सहविचार सभा संभाजीनगरात

जुनी पेंशनसाठी 2005 पुर्वीचे अनुकंपा धारकांनी 24 ऑगष्ट रोजी राज्यस्तरीय सहविचार सभा संभाजीनगरात

महाराष्ट्रातील अधिकारी-कर्मचारी यांनी उपस्थित राहावे.

मनोज एल खोब्रागडे
✍🏻सह संपादक✍🏻
मो. 9860020016

चंद्रपूर : – अनुकंपा संघर्ष समितीचे वतीने जूनी पेंशनसाठी २००५ पुर्वीचे अनुकंपा धारक कार्यरत अधिकारी-कर्मचारी यांची राज्यस्तरीय सहविचार सभा दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी महसुल प्रशिक्षण प्रबोधिनी केंद्र, छत्रपती संभाजी नगर येथे सकाळी ११ वाजता आयोजित करणेत आलेली आहे. या बैठकिला अनुकंपा संघर्ष समितीचे वरिष्ठ पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

शासनाने दिनांक १ नोव्हेंबर २००५ पूर्वी पदभरती जाहीरात / अधिसुचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर रूजू झालेल्या शासकिय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाचे धर्तीवर जूनी निवृत्ती वेतन योजना लागू केली आहे. परंतू अनुकंपा तत्वावरील निर्णयामध्ये दिनांक १ नोव्हेंबर २००५ पासून साधारण ५ ते ७वर्षापासून जे अनुकंपाधारक शासकिय सेवेची प्रतिक्षा करीत होते.

त्यांना काही कारणास्तव ५ ते ७ वर्षापासून जे अनुकंपाधारक शासकिय सेवेत नियुक्ती देण्यात आली. त्यामुळे त्यांना जुने पेंशनचा लाभ मिळाला नाही.

तरी वित विभाग, शा.नि.क.स.२०२३/प्र क ४६/सेवा ४ दिनांक २ फेब्रुवारी २०२४ नुसार याच धर्तीवर अनुकंपा तत्वावरील दिनांक १ नोव्हेंबर २००५ पुर्वी ज्यांची नावे अनुकंपा यादीमध्ये समाविष्ट होती. त्या सर्व अधिकारी / कर्मचारी यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात यावी. या मागणीसाठी अनुकंपा संघर्ष समितीने कंबर कसली असून राज्यभरात ठिकठिकाणी २००५ पूर्वीच्या अनुकंपा धारक कर्मचा-यांची बैठका आयोजित करणेत येत आहेत. जुनी पेंशनसाठी युध्दपातळीवर अनुकंपा संघर्ष समितीचे वतीने राज्यभरात ठिकठिकाणी सहविचार सभा आयोजित करून मोठ्या प्रमाणात जनजागती करणेत येत आहे. याबाबत अनेक मुख्यमंत्रीसह अनेक मंत्री महोदय, आमदार, खासदार यांना अनुकंपा संघर्ष समितीने प्रत्यक्ष भेट घेवून चर्चा करून याबाबत निवेदने सादर केली आहेत.

दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी होणा-याया बैठकिला महाराष्टातील २००५ पूर्वीच्या अनुकंपा धारक अधिकारी तथा कर्मचा-यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा समन्वयक श्री गुरुदास गुरनुले जिल्हा शाखा अनुकंपा संघर्ष समिती यांचे वतीने करण्यात आले आहे.