पालघर जिल्ह्यात शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पालघर जिल्ह्यात शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

अरविंद बेंडगा
तलासरी तालुका प्रतिनिधी
7798185755

तलासरी :- मुंबई येथील भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात काल (दि. 21 ऑगस्ट) झालेल्या कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातील विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेश कार्यक्रमास भाजप प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनासह, जिल्हाध्यक्ष भरत भाई राजपूत यांच्या उपस्थितीत पार पडला.
तलासरी तालुक्यातून शिवसेना शिंदे गटाचे माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश सांबर, पंचायत समिती सदस्य भाईलाल दुबळा, जिल्हा परिषद सदस्या गीता धामोडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले. त्याचबरोबर शिवसेना उबाठा गटाचे दिवंगत माजी आमदार राजाराम ओझरे यांचे चिरंजीव सुधीर ओझरे यांच्या नेतृत्वाखाली सरपंच, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी सरपंच व माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण जाना बरफ यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
या प्रसंगी भाजप तलासरी तालुका अध्यक्ष विवेक करमोडा म्हणाले की, “भारतीय जनता पार्टी हा एक पक्ष नसून परिवार आहे. या परिवारात सामील झालेल्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनःपूर्वक स्वागत करतो. त्यांच्या येण्याने पक्षाचे बळ वाढेल आणि आपण सर्वजण मिळून समाजकार्यासाठी व पक्षवाढीसाठी काम करू.”