*सोयाबीन पीक झाले मातीमोल, शेंगांना फुटले कोंब*

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या शेंगांना कोंब फुटल्याच्या तक्रारी आहेत. ‘उभ्या आयुष्यात पहिल्यांदाच सोयाबीनच्या हिरव्या शेंगांना कोंब फुटताना पहात आहे’, अशी प्रतिक्रिया वसंत धवस यांनी व्यक्त केली.
वर्धा:- सोयाबीनला नगदी पीक म्हटले जाते. पण पिकले तर सोन्यासारखे अन्‌ बुडाले तर धुयधानी. यंदा यवतमाळ जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हाच अनुभवला आला आहे. कशाबशा झाडांना भरघोस शेंगा लगडल्या. मात्र, वातावरणातील बदलामुळे चक्क सोयाबीनच्या हिरव्या शेंगातून कोंबे निघालीत.
शेतकऱ्यांना पहिला मार सोयाबीन बियाण्याने दिला. पावसाची साथ मिळत असताना कीडीने हल्ला केला. चक्रीभुंगा, खोडकिड, येलो मोझॅक, मर अशा रोगांनी सोयाबीन पिकाला जंग जंग पछाडले. विपरीत परिस्थितीत सोयाबीन पीक टिकून राहिले. शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत असताना पावसाळी वातावरणामुळे आर्द्रता निर्माण झाली व या अर्धवट परिपक्व हिरव्या शेंगाच्या दाण्यांतून कोंब बाहेर आले. या कोबांना पालवीही फुटली. मोठ्या प्रमाणात शेतकरी हा प्रकार पहिल्यांदाच अनुभवत आहे.
या प्रकाराने जिल्ह्यातील हजारो हेक्‍टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाला मोठा झटका बसला आहे. वर्धा कृषी उपविभागातील हिंगणघाट, आर्वी, समुद्रपुर, पुलगाव, देवळी या तालुक्‍यातील परिस्थिती चिंताजनक आहे. हिंगणघाट तालुक्‍यातील काही क्षेत्रात प्रत्येक झाडावरील सोयाबीन शेंगांना कोंब फुटल्याने ते हबकून गेले आहे. अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या शेंगांना कोंब फुटल्याच्या तक्रारी आहेत. ‘उभ्या आयुष्यात पहिल्यांदाच सोयाबीनच्या हिरव्या शेंगांना कोंब फुटताना पहात आहे’, अशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहे. आता कोंब फुटल्याने सोयाबीन जनावरांना खाऊ घालण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे अनेक शेतकरी म्हणाले. सोयाबीन शेंगांना कोंब फुटण्याच्या या सार्वत्रिक प्रकाराने सोयाबीन उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत.

*कृषी मंत्री आणी सचिवांचे लक्ष आहे घ्यावे !*
वर्धा जिल्हाच नव्हे तर विदर्भातील यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलडाणा जिल्ह्यांशिवाय नांदेडसह सोयाबीन पट्ट्यात शेंगांची हीच परिस्थिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here