गडचिरोली जिल्ह्यातील विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड प्रकल्पात बाधा आणणाऱ्या नक्षलवादी कारवायांना जशास तसे उत्तर देण्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिले निर्देश….
गडचिरोली जिल्ह्यातील नरभक्षक वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याचे आदेश…

गडचिरोली जिल्ह्यातील नरभक्षक वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याचे आदेश…
✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यू-8208166961
गडचिरोली : -गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पाच्या जवळील एका ५० वर्षीय व्यक्तीची नुकतीच नक्षलवाद्यांकडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली असून या व्यक्तीच्या मृतदेहासोबत नक्षलवाद्यांनी एक चिठ्ठी लिहून सुरजागड प्रकल्प त्वरित थांबवण्याचा इशारा दिला होता. या घटनेनंतर आज तातडीने बैठक घेऊन तेथील परिस्थितिचा आढावा घेतला. सदर मृत व्यक्तीचा सुरजागड प्रकल्पाशी कोणताही संबंध नसल्याचे यावेळी पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलं.
सुरजागड लोहखनिज प्रकल्प राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून तो कार्यान्वित करणे ही शासनाची प्राथमिकता आहे. त्यामुळे हा प्रकल्प राबवताना त्यात कुणी आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यास जशास तसे उत्तर देण्याचे निर्देश यासमयी दिले.
गडचिरोली जिल्ह्यातील १७ नागरिकांचा तसेच ५०० जनावरांवर हल्ला करित जीव घेणाऱ्या नरभक्षक वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याचे निर्देश आजच्या बैठकीत दिले. यासाठी ‘वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया’ सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेची मदत घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
या बैठकीला गडचिरोलीचे आमदार डॉ.देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मीना, गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य वन संरक्षक अधिकारी मानकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.