हिंगणघाट वंचित बहुजन आघाडीत राजकिय भूकंप, अनेक कार्यकर्ते वंचितला सोडण्याचा तयारीत.

✒ प्रशांत जगताप ✒
कार्यकारी संपादक
9766445348
वर्धा/हिंगणघाट:- वर्धा जिल्हातील हिंगणघाट तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीत सध्या बिघाडीचे चित्र असल्याचे दिसून येते आहे. काही दिवसात वंचित बहुजन आघाडीत राजकिय भूकंप हौऊन शेकडोच्या वर कार्यकर्ते वंचितला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहे.
मिडिया वार्ता न्यूजला प्राप्त झालेले माहितीनुसार हिंगणघाट येथील वंचित बहुजन आघाडीत लवकरच राजकिय भूकंप होणार आहे. हिंगणघाट येथील वंचितचे नेते डॉ. उमेश वावरेसह अनेक कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीतुन बाहेर पडणार आहे. माघील अनेक दिवसापासून वर्धा जिल्हात वंचित बहुजन आघाडीत दोन गट पडले आहे. त्यात मोठ्या प्रमाणात मतभेद असल्याने कुरजोडीचे राजकारण सुरु आहे. त्यामूळे प्रामाणीक कार्यकर्ते विभागले गेल्याचे दिसून येते आहे.
डॉ. उमेश वावरे यांनी दिले प्रसिद्धि पत्रक
“मी मागील 3 वर्षा पासून वंचित बहूजन आघाडी या पक्षामध्ये निष्ठेने काम करीत आहे. मी वंचित बहूजन आघाडी हिंगणघाट विधानसभा मतदार संघातुन उमेदवारी घेऊन इतर पक्षाची लढत दिली आहे. परंतु तिन वर्षा पासुन मि पक्षातील वरिष्ठ नेत्यांला सांगितल्या नंतर ही त्यांनी माझा कार्यकर्त्याना सावत्र वागणुक देत संघटनेत कोणतेही ही पद दिले नाही. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांमध्ये पक्षा बाबत निराशाची भावना निर्माण झाली आहे. तसेच मला सुद्धा पक्षामध्ये कुठला ही बाबतीत आत्मसन्मान मिळत नाही. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्तेची गरज विचारत घेता मला सुद्धा पक्ष सोडनाची वेळ आलेली आहे.
अशा पद्धतीने प्रेस रिलीज काढूण उमेश वावरे यांनी वर्धा जिल्हातील स्थानिक नेत्यांनवर गंभीर आरोप केले आहे. उच्च शिक्षीत असलेले डॉ. उमेश वावरे यांची ओळख कामगार नेते म्हणुन सर्वीकडे आहे. त्यांच्या नेत्ववात येथे मोठे मिल आंदोलन उभारण्यात आले होते. त्यांच्या जाण्याने वंचित बहुजन आघाडीत मोठे भोगडळ पडण्याची शक्यता आहे. कारण डॉ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वाखाली वंचीत बहुजन आघाडीची अनेक आंदोलन झाली. त्यांनी हिंगणघाट तालुक्यात गावागावात शाखा स्थापन करुन ओबीसी, एससी, एसटी समाजातील अनेक तरुणांना पक्षात आणल पण आता त्याचीच घुसमळ होत असल्यामुळे ते वंचितला शेकडो कार्यकर्तासह सोडचिठ्ठी देणार आहे.