लाडबोरी ग्रामपंचायत च्या ग्राम सभेत अखेर म.न.रे.गा.च्या कामा मधील बोगस मजूर भरती च्या चौकशी चा ठराव मंजूर

16

मुकेश शेंडे
तालुका प्रतिनिधि, सिंदेवाही
मिडिया वार्ता न्यूज़
9011851745

लाडबोरी: ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक २१/०९/२१ ला ग्रामसभेचे आयोजन केले.या मध्ये वादग्रस्त असलेले म.न.रे. गा मधील बोगस मजूर दाखवून शासकीय निधीची उचल केल्या असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर सबळ पुरावे माहिती अधिकार अर्ज नुसार प्राप्त झाले. या बाबत वारंवार पंचायत समिती कडे तक्रार अर्ज करून चौकशी ची मागणी करण्यात येत होती.पंचायत समिती मधील लेट लतिफ कार्यप्रणाली मुळे चौकशी करण्यास टाळाटाळ केली जात होती. अखेर गावातील जागरूक नागरिक हरेंद्र नागदेवते व इतर नागरिकांच्या मदतीने हा म.न.रे.गा.च्या ३३ कोटी वृक्ष लागवड कामात संबंधित कामावर रोजगार सेवकांनी बोगस मजूर भरती करून शासकीय निधीचा उचल करून स्वतःचा आर्थिक फायदा केलेला आहे. या विषयावर ग्रामसभेत लक्ष वेधले या बाबत नेहमी व वारंवार वृतपत्र व पोर्टल न्यूज च्या माध्यमातून या म.न रे.गा.च्या भ्रष्टाचार बाबत बातम्या सुद्धा प्रसिद्ध झाल्या आहेत.अखेर हरेंद्र नागदेवते व गावातील जागरूक नागरिक यांच्या संघर्षाला यश आले व ग्रामसभेत या विषयावर चर्चा करून या भ्रष्टाचार ची चौकशी करण्यात यावी याचा ठराव ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.चौकशी दरम्यान सत्याच्या संघर्ष चा विजय होतो की खोट्या भ्रष्टाचार चा विजय होतो हे चौकशी अधिकारी यांच्या अहवाल आल्यावरच सत्यता बाहेर पडले. या प्रकरणावर गावातील नागरिकांचे लक्ष लागून आहे. संबधित ग्राम सभा सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली सचिव लोणारे साहेब यांनी योग्य रित्या पार पाडली .