बल्लारपूर येथील संतोषीमाता वार्डात पाऊसामुळे घर कोसळलेल्या परिवाराला नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी प्रत्यक्ष भेट देवुन केली आर्थिक मदत

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694
बल्लारपुर :-शहरात पावसामुळे संतोषीमाता वार्डातील श्री.देवनाथ प्रजापति यांचे घर कोसळले असता,नगराध्यक्ष हरीश शर्मा यांना कळताच त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली व परिवाराला या आकस्मिक आलेल्या संकट काळी न घाबरता स्वतःला सांभाळण्या करिता धीर दिला व आर्थिक मदत केली. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष श्री.काशी नाथ सिंह,महामंत्री श्री.मनीष पांडे,भाजयुमो शहर महामंत्री श्री.घनश्याम बुरडकर,श्री.राजेश कैथवास,अशोक कैथवास,श्री.बबलू गुप्ता हे उपस्थित होते.