राजुरा शहरात गणेश विसर्जन उत्साहात व शांततेत संपन्न राजुरात बाप्पाचे विसर्जन उत्साहात साजरे : प्रशासनाची उत्तम व्यवस्था

47

राजुरा शहरात गणेश विसर्जन
उत्साहात व शांततेत संपन्न

राजुरात बाप्पाचे विसर्जन उत्साहात साजरे : प्रशासनाची उत्तम व्यवस्था

राजुरा शहरात गणेश विसर्जन उत्साहात व शांततेत संपन्न राजुरात बाप्पाचे विसर्जन उत्साहात साजरे : प्रशासनाची उत्तम व्यवस्था
राजुरा शहरात गणेश विसर्जन
उत्साहात व शांततेत संपन्न
राजुरात बाप्पाचे विसर्जन उत्साहात साजरे : प्रशासनाची उत्तम व्यवस्था

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

राजुरा सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे : मार्च 2019 मध्ये आलेला कोरोना ठाम मांडून मुक्कामाला बसला की काय व त्यामुळे सर्व सण उत्सवावर असलेले निर्बंध यातून जनसामान्य माणसाची अजूनपर्यंत पूर्णपणे सुटका झाली नसून या सर्व बाबींचा प्रभाव महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाडक्या बाप्पावर ही झाला आहे १० सप्टेंबरला बाप्पाचे आगमन झाले १० दिवस मुक्काम करून अनंत चतुर्दशी च्या दिवशी १९ सप्टेंबरला बाप्पाला निरोप देण्यात आला तो पुढल्या वर्षी लवकर येण्याच्या आशेने, दरवर्षी प्रमाणे असलेले ढोल-ताशे, डीजेच्या तालावर नाचणारे गणेशभक्त, शिवाय आखाडे असे कोणतेही चित्र दिसत नसले तरी गणेशभक्तांचा उत्साह आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतांना दिसून येत होता.
नगर परिषद राजुरा च्या वतीने नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने गणेश विसर्जनासाठी मात्र गणेश भक्तांची श्रद्धा म्हणावी की आस्था राजुरा शहरातील अनेक गणेश मंडळांनी गणपती विसर्जनाला प्राधान्य दिले आज सकाळ पासूनच घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांनी राजुरा नगर परिषद समोर सध्या तलाव या ठिकाणी गणेश विसर्जन केले यावेळी नगर परिषद राजुरा चे कर्मचारी निर्माल्य संकलन व गणेश विसर्जनासाठी सूचना देत होते तसेच राजुरा पोलीस विभागाने या ठिकाणी चोख बंदोबस्त राखला होता विसर्जनासाठी येणारया गणेश मंडळा च्या सदस्यांना सतत सूचना दिल्या जात होते