उत्कृष्ट युवा सरपंच पुरस्काराने प्रफुल्ल भुसारे पाटील सन्मानित…..
गोपाल नाईक
नांदेड जिल्हा प्रतिनिधी…
मो.7499854591.
नांदेड : दैनिक युवाराज्य व चॅनलच्या सातव्या वर्धापन दिनानिमित चॅनलच्या वतीने विविध समाजउपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच ग्रामीण विकासाच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून चॅनलच्या वतीने सामाजिक व राजकिय कार्यात आपले वेगळेपण सिद्ध करुण ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी अविरतपणे कार्य करणार्या कतृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.युवाराज्याच्या माध्यमातून माहुर तालुक्यातील कुपटी गावचे युवा सरपंच प्रफुल्ल बंडू भुसारे पाटील यांच्या कार्यची दखल घेऊन उत्कृष्ट कार्याचा सन्मान करण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली असून त्यांचा सन्मान युवा पत्रकार गोपाल नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रफुल्ल पाटील हे युवा सरपंच असून ग्रामीण भागात एका आदिवासी बहुल गावामध्ये त्यांनी लोकोपयोगी कार्य करुण व शासकिय योजनाचा लाभ घेऊन गावाला शुशोभित केले आहे.लोकसहभागातून सर्वांसमोर आदर्श निर्माण करत संपूर्ण गावामध्ये व गाव परिसरात एका हजारापेक्षा जास्त वृक्षांची लागवड करुण पर्यावरणास मदत केली.प्रफुल्ल पाटील यांची कुपटीसह परिसरातील पाचुंदा, वानोळा,बोरवाडी,दहेगाव,साकुर,भिमपूर या गावखेड्यातील लोंकासोबत अत्यांत सलोख्याचे व जिव्हाळ्याचे संबध आहेत.अडीनडीला प्रत्येकास सहकार्य करतात. प्रफुल्ल पाटील यांना त्यांच्या वडिलांकडून अर्थात बंडू भुसारे पाटील यांच्याकडून राजकारणाचे व समाजकारणाचे बाळकडू मिळाले आहे.त्याचाच उपयोग गाव हितासाठी प्रफुल्ल पाटील करत आहेत.म्हणून त्यांच्या उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा सन्मान युवाराज्य चॅनलच्या सातव्या वर्धापन दिनानिमित करण्यात आला.यानिमित्त त्यांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.तसेच त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केल्या जात आहे.