महिला आरक्षण विध्येयकाचे सौ.संध्याताई प्रफुल्ल राठोड यांच्याकडून स्वागत…

53
महिला आरक्षण विध्येयकाचे सौ.संध्याताई प्रफुल्ल राठोड यांच्याकडून स्वागत...

महिला आरक्षण विध्येयकाचे सौ.संध्याताई प्रफुल्ल राठोड यांच्याकडून स्वागत…

महिला आरक्षण विध्येयकाचे सौ.संध्याताई प्रफुल्ल राठोड यांच्याकडून स्वागत...

गोपाल नाईक
नांदेड जिल्हा प्रतिनिधी…
मो.7499854591

नांदेड : भारतीय जनता पार्टी नांदेड जिल्हा उत्तर महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ.संध्याताई प्रफुल्ल राठोड यांनी महिला आरक्षण विध्येयकाचे विशेष स्वागत केले. संसदेत चालु असलेल्या विशेष अधिवेशना दरम्यान महिलांना राजकारनामध्ये संधी देण्यासाठी मोदी सरकारने लोकसभेत महिला आरक्षण विध्येयक पारीत केले.या विध्येयकाने राजकारनामध्ये महिला प्रतिनीधींचा सहभाग तेहत्तीस टक्याने वाढणार आहे.ही बाब भारतीय महिलांसाठी विशेष संधी मानली जाते.आपल्या देशाची ओळख पुरुष प्रधान अशीच काहीसी आहे.राजकारनामध्ये महिलांचा विशेष असा सहभाग दिसून येत नाही त्यामुळे महिलांचे प्रश्न स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी उलटुनही सुटले नाहीत.व महिलांवर होणारे अन्याय थांबले नाहीत.पुरुषी मानसिकतेने महिलांना नेहमिच दुय्यम मानले.महिलांना आपले कतृत्व सिद्ध करण्याची क्वचितच संधी उपलब्ध करुण दिली.येथिल व्यवस्थेने महिलांचे नेहमीच खचीकरण केले.त्यामुळे महिंलाचा सर्वांगीण विकास साधता आला नाही.
महिला या कतृत्वान असतात.योग्य संधी उपलब्ध करुण दिल्यास त्या संधीचे सोनं केल्याशिवाय राहनार नाहीत.त्यामुळे महिलांचीही भागीदारी सत्तेत राहावी.याच हेतुने मोदी सरकारने हे ऐतिहासिक पाऊल उचलले असे यावेळी बोलताना संध्याताई राठोड यांनी आपले मत व्यक्त केले.व मोदी सरकारचे आभार मानले..