वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार • ताडाळा येथील घटना

56
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार • ताडाळा येथील घटना

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

• ताडाळा येथील घटना

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार • ताडाळा येथील घटना

🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 8830857351

मूल : 22 सप्टेंबर
तालुक्यातील ताडाळा येथील शेतात वाघाने हल्ला करून एका शेतकर्‍याला ठार केले. ही घटना शुक्रवार, 22 सप्टेंबरला सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली. सूर्यभान बाबाजी टिकले (55 रा. चिचाळा) असे वाघाने ठार केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे.
सूर्यभान हा आपल्या शेतात धानाची पाहणी करण्याकरिता सकाळी 7 वाजता गेले होते. त्यावेळी तिकडे असलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जागीच ठार केले व 2 किलोमीटरपर्यंत ओढत जानाळा जंगलातील कक्ष क्रमांक 522 येथे नेऊन शरिराचा काही भाग खाल्ला. घटनेची माहिती कळताच मूल पोलिस निरीक्षक परतेकी, वनविभाग प्रादेशिक व एफडीसीएमचे वनपरिक्षेत्र अधिकारी गरूडे व बोथे, मूल येथील प्राणीमित्र उमेशसिंह झिरे, क्षेत्र सहायक खणके, मस्के, कूमरे, चौरे, वनरक्षक गुरनूले, मानकर, शीतल चौधरी, गवई, दीवटे, येसांबरे, येनूरकर, गव्हारे घटनास्थळी दाखल झालेत. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. वाघाने शेतकर्‍यांना ठार केल्याच्या घटना वारंवार घडत असून, वाघाचा बंदोबस्त करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.