गोरेगांव संत रोहिदास नगर मधील तरुणांचे शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश
गेली १५ वर्षे राष्ट्रवादीने राखलेले गड आदित्य गोरेगांवकरांनी फोडले
✍️नंदकुमार चांदोरकर ✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞8983248048 📞
माणगांव :- संत रोहिदास नगर गोरेगांव मधील तरुणांनी बहुसंख्येने मा.आ. भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत व आदित्य गोरेगांवकर यांच्या नेतृत्वाखाली शिवनेरी, मा. आ. भरतशेठ गोगावले यांच्या निवासस्थानी, शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केले असून आदित्य गोरेगांवकरांचा या प्रवेशात सिंहाचा वाटा आहे. संत रोहिदास नगर भगवामय करण्यासाठी आदित्य गोरेगांवकरांनी गेली कित्येक वर्षे परिश्रम घेतले आहेत. नगरात प्रतिस्पर्धी बहुसंख्येने असल्यामुळे कित्येकदा त्यांच्याशी वाद झाले, कित्येकदा स्वतः चे अपमान झाले व कित्येकदा आपण कमकुवत असल्याची जाणीव प्रतिस्पर्धी करून दिली. परंतू, प्रत्येक अपमान सहन करत, प्रत्येक संकटातून मार्ग काढत, कट कारस्थानाला सामोरे जात व कित्येक प्रलोभने धुडकावून लावत, त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले. आणि अखेर आज तो सोन्याचा दिवस उगवला आणि तरुणांनी बहुसंख्येने शिवसेनेमध्ये प्रवेश करत भगव्याची कास हातात धरली. “हे तर फक्त ट्रेलर आहे… पिक्चर अजून बाकी आहे…” असे फिल्मी डायलॉग मारून, उर्वरित संत रोहिदास नगर मधील नागरिकांचे येत्या काही दिवसात शिवसेनेत प्रवेश करून घेणार, असे आदित्य गोरेगांवकरांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
या वेळी संत रोहिदास नगर मधील अमोल गोरेगांवकर, अनिकेत गोरेगांवकर, वैभव गोरेगांवकर, आदित्य गोरेगांवकर, राकेश गोरेगांवकर, प्रतीक गोरेगांवकर, अभिषेक गोरेगांवकर, शुभम गोरेगांवकर, अक्षय गोरेगांवकर, चिंतन गोरेगांवकर, नामदेव गोरेगांवकर, ओम गोरेगांवकर, अमेय गरुडे, सुमित खामगांवकर, अनुज जाधव, आराध्य आंबेतकर, अनिष आंबेतकर, सुजल नातेकर, गणेश पहेलकर, पियुष पहेलकर उपस्थित होते व या सर्व होतकरू तरुणांनी आगामी होणार्या विधानसभा निवडणुकीत मा. आ. भरतशेठ गोगावले यांचे एकपात्री करून त्यांना भरघोस मातांनी निवडून आणण्याची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून घेतली.