बेपत्ता कोतवालाचा अखेर मृतदेहच आढळला
🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 22 सप्टेंबर
मागील दहा दिवसांपासून बेपत्ता
असलेले सिंदेवाही तालुक्यातील सरडपार गावचे
कोतवाल नंदकिशोर खोब्रागडे यांचा
रविवार, 22 सप्टेंबर रोजी मूल तालुक्यातील उमा
नदीत मृतदेह आढळून आला. त्यामुळे महसूल व
पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. त्यांची हत्याच
करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या
नातेवाईकांनी केला आहे. याआधीच
सिंदेवाही पोलिसांनी त्यांच्या बेपत्ता प्रकरणी
तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. तर
दोघांचे चारचाकी वाहनही जप्त केले होते.
मूल पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय
तपासणीसाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. पुढील तपास मूल व सिंदेवाही पोलिस करीत आहेत.