नुकसान भरपाई देण्यासाठी मनोहरराव चव्हाण, तहसिलदार साहेब उमरेड यांना गट ग्रामपंचायत हिवरा तसेच शिवसेना शिंदे गट तर्फे निवेदन देण्यात आले.

152

नुकसान भरपाई देण्यासाठी मनोहरराव चव्हाण, तहसिलदार साहेब उमरेड यांना गट ग्रामपंचायत हिवरा तसेच शिवसेना शिंदे गट तर्फे निवेदन देण्यात आले.

त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर मो
9096817953

उमरेड.मनोहरराव चव्हाण, तहसिलदार साहेब उमरेड यांना गट ग्रामपंचायत हिवरा तसेच शिवसेना शिंदे गट तर्फे निवेदन देण्यात आले.
उमरेड तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याबाबत.
निवेदनामध्ये सुजिता शेरकी सरपंच हिवरा तसेच चंद्रशेखर बानकुळे उपजिल्हा प्रमुख नागपूर (ग्रा.) निलेश ठाकरे उपसरपंच हिवरा, रमेश माहातळे उमरेड विधानसभा प्रमुख (शिंदे गट) संजय पाल सदस्य ग्रामंपचायत हिवरा, दिलीप चहांदे, पुष्पाबाई रमेश माहातळे, अनुसया कन्नाके, वासुदेव मोंडे, गुलाब सेलोटे, नत्थु सोनवाने, नानाजी खोंडे, अमित मुळे, हिरामण भोयर, व इतर ग्रामवासी उपस्थित होते.
सदर नमूद विषयाकडे आपले लक्ष वेधून घ्यावे की, दि. 15/08/2025 ते दि. 15/09/2025 या कालावधीत सिर्सी सर्कल, बेला सर्कल, मकरधोकडा सर्कल, वायगाव सर्कल मौजा हिवरा, सुकळी, सेलोटी, जुनोनी, येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झालेले आहे व पिके पूर्णपणे नष्ट होवून शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. तरी हेक्टरी 1 लाख रू. नुकसान भरपाई देण्याची कृपा करावी.

सदर परिस्थिती लक्षात घेता पिकाचे पंचनामे आपल्या स्तरावर होईपर्यंत शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळावा म्हणून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात यावी हि शेतकऱ्यांची नम्र विनंती आहे.