म्हसळा तालुक्यात घटस्थापना व शारदिय नवरात्र उत्सोवाला प्रारंभ

112

म्हसळा तालुक्यात घटस्थापना व शारदिय नवरात्र उत्सोवाला प्रारंभ

सार्वजनिक २५ तर खासगी ८ देवींच्या मुर्तीं स्थानापन्न

म्हसळा: संतोष उध्दरकर.

म्हसळा:गणेशोत्सवानंतर वेध लागतात ते नवरात्रोत्सवाची. म्हसळा तालुक्यात
ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये सार्वजनिक २५ तर खाजगी ८ असे एकुण २९ देवींच्या मुर्तीं ची विधिवत पुजा अर्चा करून प्राणप्रतिष्ठा करून स्थानापन्न करण्यात आली असून. यावर्षी दि.२२ सप्टें सोमवार रोजी संपूर्ण तालुक्यात सह शहरात नवरात्रोत्सवाची मोठ्या उत्साहाने सुरुवात होताना दिसत आहे,
काही ठिकाणी घट मांडून घटस्थापना करण्यात आली असुन आज देखील धान्य,रव पेरण्याची प्रथा आहे. यावेळी देवीची प्राणप्रतिष्ठा करून नऊ दिवस भजन, किर्तन, पुजा अर्चा, महिलांनी खेळावयाचा भोंडला, गरबा, विविध खेळ, स्पर्धा, शेवटच्या दिवशी फॅन्सी ड्रेसचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात येते.
यावेळी श्री राम नवरात्र मंडळाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
नवरात्रौत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून म्हसळा पोलिस ठाण्याच्या वतीने
योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.