Home latest News हरित महाराष्ट्र – समृद्ध महाराष्ट्र मोहीम अंतर्गत सर्वोदय महाविद्यालयात वृक्षारोपण*
*हरित महाराष्ट्र – समृद्ध महाराष्ट्र मोहीम अंतर्गत सर्वोदय महाविद्यालयात वृक्षारोपण*
जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही प्रतिनिधी
8806689909 :-
राज्य शासनाच्या हरित महाराष्ट्र – समृद्ध महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत सर्वोदय महाविद्यालय, सिंदेवाही येथे वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या उपक्रमाचे मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुशील कुंजलवार यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. रिझवान शेख व प्रा. अमित उके यांच्या सक्रिय सहभागातून करण्यात आले.
या प्रसंगी डॉ. सिद्धार्थ मडारे, डॉ. रमेश राठोड, महाविद्यालयीन प्राध्यापकवर्ग, स्वयंसेवक विद्यार्थी व कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालय परिसरात फळझाडे, फुलझाडे व सावली देणारी विविध झाडे लावण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याने ‘एक विद्यार्थी – एक झाड’ हा संकल्प करून झाडांची निगा राखण्याची जबाबदारी स्वीकारली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना प्राचार्य डॉ. सुशील कुंजलवार म्हणाले, “आज लावलेले वृक्ष उद्याच्या पिढ्यांसाठी प्राणवायू, सावली आणि पर्यावरण संतुलनाचा महत्त्वपूर्ण स्त्रोत ठरणार आहेत. वृक्षारोपण करणे ही केवळ जबाबदारी नसून जीवनमूल्य आहे. प्रत्येक तरुणाने हा संकल्प मनापासून पाळला, तर महाराष्ट्र खऱ्या अर्थाने हरित व समृद्ध होईल.”
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागरूकता निर्माण करून स्वच्छ, हरित आणि प्रदूषणमुक्त महाराष्ट्र घडविण्याचा संदेश देण्यात आला. महाविद्यालयीन परिसरात नव्याने रुजविलेल्या रोपांच्या हरिताईमुळे वातावरणात एक नवीन उर्जा व सकारात्मकता निर्माण झाली.