पोलीस स्मृतीदिना निमित्त शहीद जवानांना अभीवादन
कर्तव्यावर असतांना स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता हुतात्मा झालेल्या सर्व शहीद जवानांना पोलीस मुख्यालय, वर्धा येथे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
मुकेश चौधरी प्रतिनिधी
वर्धा:- 21 ऑक्टोंबर म्हणजे पोलीस स्मृतीदिन, 1959 मध्ये याच दिवशी लदाख मधील भारताच्या सिमेवर बर्फाच्छादीत व निर्मनुष्य अशा हॉटस्प्रिंग या ठिकाणी पोलीस दलातील काही जवान गस्त घालत असतांना त्यावेळी दबा धरुन बसलेल्या चिनी सैनिकांनी त्यांचेवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात भारतीय पोलीस जवानांनी कडवे आवाहन देत शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली. यात अनेक सैनिक विरगतीला प्राप्त झाले. या घटनेमुळे संपुर्ण भारतभर दुखाची छाया पसरली. विर जवानांनी दाखवलेल्या या अतुलनीय शौर्यापासुन इतरांना स्फुर्ती मिळावी आणि कर्तव्याची व राष्ट्र निष्ठेची जाणीव व्हावी म्हणुन शहीद जवानांच्या स्मृती पित्यर्थ 21 ऑक्टोंबर हा दिवस संपुर्ण भारतभर पोलीस स्मृती दिन म्हणुन साजरा केला जातो.
यावर्षी संपुर्ण देशभरातुन एकुण २६४ पोलीस अधीकारी व पोलीस जवान शहीद झाले. यामध्ये महाराष्ट्रातील एकुण ५ पोलीस जवानाचा समावेश आहे.
भारतीय पोलीस अधिकारी व जवान यांनी आपले कर्तव्य पार पाडीत असतांना जिवाची पर्वा न करता प्राणाची आहुती दिली त्या शहीद विरांना पोलीस मुख्यालय, वर्धा येथे आज सकाळी 8.00. वाजता मा. पोलीस अधीक्षक, वर्धा प्रशांत होळकर यांनी पुष्पचक्र अर्पण केले व बंदुकीच्या 3 फैरी झाडुन शहीदांना श्रध्दांजली देण्यात आली.