शहरातील विकास कामात लोकप्रतिनिधी व त्यांचे आप्तेष्टचं ठेकेदार…!

59

शहरातील विकास कामात लोकप्रतिनिधी व त्यांचे आप्तेष्टचं ठेकेदार…!

शहरातील विकास कामात लोकप्रतिनिधी व त्यांचे आप्तेष्टचं ठेकेदार...!
शहरातील विकास कामात लोकप्रतिनिधी व त्यांचे आप्तेष्टचं ठेकेदार…!

क्रिष्णा वैद्य ✒
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
95454 62500

ब्रम्हपुरी:-ब्रह्मपुरी शहराला शैक्षणिक, संस्कृतीक व आरोग्य नगरी म्हणून जिल्ह्यात मोठा मान आहे. ब्रह्मपुरी तालुक्याच्या सभोवताल असलेल्या बहुतांश नागरिकांनी ब्रह्मपुरी मध्ये स्वतःचे राहते घर असावे व अशा सुंदर शहरांमध्ये आपले वास्तव असावे असे स्वप्न बघत असतात . यामुळे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सद्यस्थितीत नगर परिषद स्थायिक संस्था असलेल्या शहर जिल्हा होण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसत आहे मात्र हे सर्व घडत असताना स्थानिक नगरपरिषद मध्ये प्रभागातून निवडून जाणारे बहुतांश लोकप्रतिनिधी प्रभागातील विकास कामाकडे दुर्लक्ष करून, बांधकाम क्षेत्राशी जवळीकता साधत नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या बांधकामाचे कंत्राट मिळवण्यासाठी स्वतः व आपल्या आप्तेष्ठानमार्फत भयंकर अशा स्पर्धेत गुंतलेले दिसून येत असून ठेकेदारी च्या माध्यमातून स्व: विकास करण्यास पुढे-पुढे होत असल्याचे ब्रह्मपुरी नगर परिषद मध्ये बघायला मिळत आहे.

नगरपरिषद ब्रम्हपुरी मधील सत्तापक्ष व विरोधीपक्षातील अनेक नगरसेवक व त्यांचे आप्तेष्ठचं छुप्यामार्गाने नगरपरिषद चे “खास ठेकेदार” झाले असून ब्रम्हपुरी नगरपरिषद मध्ये होणाऱ्या प्रत्येक विकासकामाचा ठेका आता न. प. लोकप्रतिनिधी च्या दावणीला बांधला जातं असल्याचे दिसत आहे. शहरातील विकास कामाचा कंत्राट ईतर दुसऱ्या ठेकेदाराने घेतल्यास मर्जीतील लोकांना कंत्राट मिळाले नाही म्हणून लोकप्रतिनिधी या नात्याने “इगो हर्ट” होतं असल्याने संबंधित कंत्राटदाराला अमाप अडथळे निर्माण करण्याचा प्रघात नगरपरिषद ब्रम्हपुरी येथे बघायला मिळत आहे.