सायन कोळीवाडा येथे विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न.

46

सायन कोळीवाडा येथे विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न.

सायन कोळीवाडा येथे विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न.
सायन कोळीवाडा येथे विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न.

गुणवंत कांबळे✒
मुंबई प्रतिनिधी
मो. नं.- ९८६९८६०५३०
सायन कोळीवाडा विधानसभा काँग्रेस कमिटी वार्ड क्रमांक १७६ स्थानिक नगरसेवक व विरोधी पक्ष नेता रवी राजा यांच्या प्रयत्नाने “एक झेप विकासाकडे” विविध विकास कामांसाठी सुरुवात बी.एम.सी. इमारत क्रमांक बी-३, बी-४, सी-१, सी-२, सी-३, सी-४, सी-५ यांची दुरुस्ती काम होण्यासाठी दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता नगरसेवक रवी राज यांच्या शुभहस्ते “भव्य भुमिपुजन” सोहळा करण्यात आले.

तक्षशिला बुध्द विहार,फायर ब्रिगेड जवळ रॉवली कॅम्प मुंबई या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली होती.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे हुकमराज मेहता जिल्हाध्यक्ष- द-म-मुं.जिल्हा, राकेश पांडे मुं.काँ.सचिव, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारणी अभियंता श्री. मोरे, नगरसेवक व विरोधी पक्ष नेता रवी राजा आणि आदर्श प्रतिष्ठानचे स्थानिक कार्यकर्ता सिद्धार्थ जाधव मंचावर उपस्थित होते.

तसेच नगरसेवक रवी राजा यांनी आपल्या भाषणातून आयोजकांचे आभार व्यक्त प्रदर्शन केले. सदर इमारत दुरुस्ती कामाची रूपरेषा व माहिती स्थानिक लोकांना दिली. (१) संरचनात्मक दुरुस्त्या जसे आवश्यकतेनुसार पॉलिमर मॉडिफाईल ट्रीटमेंट, मायक्रोक्रॉक्रीट इ. (२) छताचे व घरातील स्वच्छता गृहाचे जलभेदीकरण. (३) अंतर्गत तसेच बाह्य सिमेंट गिलाव्याची कामे.(४) रंगकाम करणे.(५) ड्रेनेज लाईन व प्लाम्बिंगचे कामे.(६) विद्युत कामे व इतर दुरुस्ती ची कामे.(७) भुमिगत पाणी साठवण टाकीची दुरूस्ती.(८) इमारत तिच्या आजूबाजूच्या परिसरातील पेव्हर ब्लॉक दुरुस्ती करणे. तसेच काही अडचणी, त्रास किंवा इमारतीचे बांधकाम बरोबर होत नसेल तर नक्की कार्यालयात येऊन अथवा मला मोबाइल करून संपर्क करू शकता असे बहुसंख्य उपस्थित असलेल्या स्थानिक लोकांना समवेत कामाविषयी सविस्तर मार्गदर्शन आणि माहिती देण्यात दिली. सदर आयोजक श्री.आशिष रत्ती ब्लॉक अध्यक्ष आणि या कार्यक्रमाची संपुर्ण सुत्रसंचालन श्री.जगजीवन कांबळे साहेब यांनी केले.

संयोजक-संजय सोनावणे, हेमंत पाटील, रामकिशन गुप्ता, तेजुमल पोखरण, रमेशकुमार नागराज, जयेश जाधव, संजय गायकवाड, जगजीवन कांबळे, दिनेश पुजारी, विजय जाधव, मनोज साळवी, संतोष रणखांबे, सचिन रणखांबे, नितीन रणखांबे, शरद गायकवाड, चंद्रकांत निरभवणे, राजेंद्र त्रिभुवन, आशिष बंजारे, चंद्रकांत कांबळे, गणेश कांबळे, दीपक खांबे, सुबोध सकपाळ, नरेश कांबळे, सुशिल कदम, तुकेश यादव, पिलाजी कांबळे, दत्ताराम साखरकर,प्रभाकर साखरकर, प्रमोद तिवारी,सदानंद शेट्ये, राहुल ढोस, सुनिल म्हात्रे, अर्जुन मोर आणि विशेष आर.राजेंद्र, सुधीर गायकवाड, बाळा केदारे, गणेश झगडे, कृष्णा काळे, अमोल सुर्वे, प्रवीण यादव, अविनाश पगारे, लखनसिंग अरोरा, संतोष गरूड, हितेश जगताप, तेजस निळे,राजेश जाधव, शशिकांत लोखंडे, तुषार हिरे, अमोल गायकवाड.तसेच टफी बॉईज, तक्षशिला बुध्द विहार कमिटी, आदर्श सामाजिक प्रतिष्ठान(रजि), वक्रतुंड मित्र मंडळ, साई सेवा मंडळ, पंचशील मित्र मंडळ. पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व काँग्रेस कार्यकर्ता व रॉवली कॅम्प म्युनिसिपल इमारतीतील सर्व नागरिकांनी कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थिती दर्शवली होती.