स्थानिकांना जाचक मोबाईल टॉवरचे बांधकाम थांबवा ..

47

स्थानिकांना जाचक मोबाईल टॉवरचे बांधकाम थांबवा ..

स्थानिकांना जाचक मोबाईल टॉवरचे बांधकाम थांबवा ..
स्थानिकांना जाचक मोबाईल टॉवरचे बांधकाम थांबवा ..

क्रिष्णा वैद्य ✒
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी

ब्रम्हपुरी :-
ब्रम्हपुरी येथील
विद्यानगर प्लॉट क्र. ५७४(भूमापन क्र.) येथे रहीवासी भागात मोबाईल टॉवर निर्मितीचे काम सुरु आहे. सदर बांधकामासाठी परीसरातील रहिवासी यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता (ना हरकत) बांधकाम सुरु करण्यात आलेले आहे.

मोबाईल रेडीएशन लहान मुलांना तथा वृद्धांना तसेच सर्व परिसरातील मणुष्य जातीला व पर्यावरणास धोकादायक आहे. मोबाईल टॉवर बांधकाम अधिनियम तसेच माननिय न्यायालयाने विविध केसेसमध्ये केलेल्या न्यायनिवाडयाच्या अनुषंगाने लोकवस्तीत मोबाईल टॉवर अनाधिकृत आहे.

यापूर्वी ब्रम्हपुरी नगर परिषद हद्दीत बालाजी वार्ड परिसरात असलेल्या मोबाईल टॉवर रेडिएशनमुळे दोन व्यक्ति कॅन्सरनी मृत पावल्याचे सर्वांना ज्ञात आहे, आणि त्यामुळे तेथील मोबाईल टॉवर पाडण्यात आलेले आहे.

एकीकडे शासन वृक्ष लागवड, स्वच्छता अभियान, प्रदुषण मुक्त भारत आदि मोहिमा राबवितो आणि दुसरीकडे प्रशासन Radio Polution करणाऱ्या मोबाईल टॉवरच्या बांधकामास परवानगी देते, ही दुहेरी भूमिका आम्ही सहन करणार नाही असे स्थानिक नागरिक रोषाने पेटून ओरडत आहेत.

मा. न्यायालयाचा आदेशाचे अवमान करणाऱ्या आणि जनतेच्या आरोग्याशी महत्वपूर्ण विषयावर प्रशासन सरसकट परवानगी कशी काय देऊ शकते?
या परिसरातील मोबाईल टॉवरचे बांधकाम करु देणार नाही यावर आम्ही ठाम आहोत कायद्याच्या न्यायाच्या मार्गाने आणि जनआंदोलनाच्या मार्गाने बांधकाम मोडीत काढू परंतु जनप्रतिनिधी प्रशासकिय अधिकारी म्हणून काही कर्तव्य शासनाचेही आहे, आपणास उमजावे म्हणून हे निवेदन जनतेकडून मुख्याधिकारी न प ब्रम्हपुरी, नगराध्यक्ष,दुरसंचार विभाग ब्रम्हपुरी, तहसीलदार ब्रह्मपुरी, उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांना दिल्याचे स्थानिक नागरिकांन कडून सांगण्यात आले.

सदर मोबाईल टॉवरचे बांधकाम लवकरात लवकर थांबवावे अशी जनतेकडून मागणी होत आहे. यावेळी, व्ही. एस. रामटेके, एम. एन. मेश्राम, एन. आर. मेश्राम, एम. बी. हुमने, ए.ए. चौधरी, सौ. आर. पी. रामटेके, पी. के. भोयर व अन्य वार्ड वासीय उपस्थित होते.