“गर्व नाही, निव्वळ स्वाभिमानास्पद”आहे असे शब्दात व्यक्त केले – प्रविण डोणे
“अश्वघोष”आर्ट अँड कल्चर फाऊंडेशनच्या वतीने प्रविण डोणे यांना पुरस्काराने सन्मानित
✍️गुणवंत कांबळे✍️
मुंबई प्रतिनिधी
मो.नं.९८६९८६०५३०
कोल्हापूर- दि.२० सामाजिक जाणिव जोपासणारे कलाकार, गायक आणि संगीतकार असे व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रचा सुप्रसिद्ध बुलंद आवाज मा. प्रवीण डोणे सर ‘अश्वघोष, आर्ट अँड कल्चर फाऊंडेशनच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित केले त्यामुळे त्यांचा यशाला सर्वत्र कौतुक होत आहे तसेच यापूर्वी ही प्रविण डोणे यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केलेले आहेत
शाल,पुष्पगुच्छ, सन्मानपत्र आणि ट्रॉफी असे पुरस्काराचे स्वरूप होते.
अश्वघोष आर्ट अँड कल्चर फाऊंडेशन मार्फत सुरांचे बादशहा मोहम्मद रफी यांना आदरांजली समर्पित करण्यात आलेल्या विश्वविक्रमी एशियन बुक ऑफ रेकोर्डस या उपक्रमात सहभागी नोंदवणाऱ्या गायकांचा सन्मान करण्यात आला.’महासन्मान विश्वविक्रमवीरांना’ या अंतर्गत गायकांना मेडल, ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
तसेच पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते ‘रफी रत्न पुरस्कार’ जेष्ठ गायक चंद्रकांत अलमेलकर, सूरज नाईक यांना प्रदान करण्यात आला.
फाऊंडेशनचे संस्थापक कबीर नाईकनवरे, डॉ. महेंद्र कानडे यांनी सूत्रसंचालन केले. आदिल फरास ,माजी आमदार राजू आवळे, बाळासाहेब भोसले, प्रविण कडोलीकर यांनी मनोगत आभार प्रदर्शन व्यक्त केले. सदर कार्यक्रम शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे आयोजित केला होता.