अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या तालुका उपाध्यक्षपदी प्रशांत राहुलवाड यांची नियुक्ती…
मीडिया वार्ता न्यूज
हिमायतनगर प्रतिनिधी
हिमायतनगर तालुक्यामध्ये बऱ्याच वर्षापासून आपल्या लेखणीच्या जोरावर सर्वसामान्य न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी तत्पर असणारे रिपब्लिक 24 न्यूज चे संपादक प्रशांत भाऊ राहुलवाड सरसमकर यांचे पत्रकारी क्षेत्रामध्ये कार्य पाहता अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य या पत्रकार संघटनेच्या वतीने हिमायतनगर तालुका उपाध्यक्षपदी पत्रकार प्रशांत राहुलवाड यांची बिनविरोध तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या नियुक्ती पत्रावर अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य प्रदेश संपर्कप्रमुख मा.श्री मनोज कामटे,नांदेड जिल्हाध्यक्ष शुद्धोधन हनवते,आशिष कल्याणे पाटील जिल्हा महासचिव नांदेड यांच्या स्वाक्षरीने एका नियुक्ती पत्राद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे.प्रशांत राहुलवाड यांनी अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात विविध दैनिकाच्या व न्यूज पोर्टेबल चॅनलच्या माध्यमातून सतत ग्रामीण भागातील वेगवेगळ्या स्तरावरील उपेक्षित,वंचित,शोषित पिढीत,भ्रष्टाचारावर प्रहार यासह अनेक सामाजिक,राजकीय,शैक्षणिक, आर्थिक,सांस्कृतिक,धार्मिक विषयावर लिखाण करून वंचितांना न्याय देण्याचे काम सतत करीत आले आहेत.
अतिशय कमी वेळात त्यांनी विविध विषयावर लिखाण करुन ग्रामीण भागातील सर्वसामान्य घटकांना न्याय देण्याची भूमिका घेतल्याने,त्याच्या कार्याची नोंद अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांनी घेऊन त्यांना तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती देऊन ग्रामीण भागातील युवा पत्रकारांना पत्रकारिता क्षेत्रात संधी उपलब्ध करून दिल्याचे,अनेक ग्रामीण पत्रकार बांधवा कडुन आपल्या प्रतिक्रियेत सांगितले आहे.
यांची नियुक्ती झाल्याबद्दल अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य नांदेड जिल्हाध्यक्ष शुद्धोधन हनवते, देवानंद गुंडेकर रिपब्लिक 24 न्यूज मुख्य संपादक तसेच महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष हिमायतनगर, तसेच धोंडोपंत बनसोडे लोकस्वराज्यआंदोलन जिल्हाध्यक्ष नांदेड उत्तर,विजय वाठोरे सरसमकर पत्रकार, संपादक गंगाधर गायकवाड दिघीकर,सदानंद ऐरणकर,राम जळपते राम चिंतलवार.श्रीनिवास होळकर सर. मन्ना भाऊ शिंदे दिनेश राठोड, अशा अनेक सामाजिक,राजकीय व पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन केलेले आहे.