चंद्रपूरची उमेदवारी देणार असल्यास ‘राकाँ’त प्रवेश करेल!

156
चंद्रपूरची उमेदवारी देणार असल्यास ‘राकाँ’त प्रवेश करेल!

चंद्रपूरची उमेदवारी देणार असल्यास ‘राकाँ’त प्रवेश करेल!

चंद्रपूरची उमेदवारी देणार असल्यास ‘राकाँ’त प्रवेश करेल!

• आ. किशोर जोरगेवार जयंत पाटील यांना भेटणार

🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 30 सप्टेंबर
चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मला मुंबईला बोलावले होते. परंतु, माझ्या मातोश्रीचे निधन झाल्यामुळे मी तेथून परत आलो. आता जयंत पाटील यांचा पुन्हा मला फोन आला असून, त्यांनी मला मुंबईला बोलावले आहे. तिथे गेल्यावर पक्ष प्रवेशाबाबत त्यांचा काय निर्णय झाला आहे. नियोजन काय आहे, हे ठरेल. ते मला चंद्रपूरची उमेदवारी देणार असेल, तर मी राकाँत प्रवेश करेल, अशी स्पष्टोक्ती मंगळवारी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.
जोरगेवार यांना येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा अपक्ष म्हणून निवडणूक लढायची नाही. तसे ते सुरूवातीपासूनच सांगत आले आहेत. जो पक्ष आपल्याला उमदेवारी देईल त्यांच्याकडे मी जाईल, असे ठाम मत त्यांनी आधीपासूनच तयार केले आहे.
चंद्रपूर विधानसभा मतदार संघाची उमदेवारी युती म्हणून कोणत्या पक्षाकडे जाईल, हे आधी दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठरवावे. कारण चंद्रपूरच्या जागेवर विद्यमान आमदार म्हणून माझे समर्थन शिंदे यांच्या शिवसेनेला असले तरी आपण अधिकृतपणे त्या पक्षात प्रवेश घेतलेला नाही. जोवर चंद्रपूरची जागा कुणाकडे जाईल हे स्पष्ट होत नाही, तोवर माझा कुणाकडे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. युतीतील भाजपा किंवा शिवसेना यापैकी ज्या पक्षाकडे या मतदार संघाची जागा जाईल, मी त्यांच्याकडे जाईल, असे ते म्हणाले होते. पण या दोन्ही शक्यता मावळल्याचे त्यांना दिसत आहे की काय, त्यामुळे त्यांनी आता राष्ट्रवादीकडे जाण्याचा निर्णय केला असल्याचे दिसते.