ठाकरे गटातील सुदाम पावळी यांच्या सोबत असंख्यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश संपन्न
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३
कर्जत :- दिनांक २१/१०/२०२४ रोजी सायंकाळी चार वाजता शिवतीर्थ हॉल पोसरी तालुका कर्जत या शिवसेना जाहीर पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. या वेळी सुदाम पवाळी, उल्हासराव भुर्के, वकील अमोलराजे बांदल पाटील, मनीषा थोरात यांच्या समवेत असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश झाला.
या कार्यक्रम प्रसंगी सुदाम पवाळी यांच्या समवेत कडाव ग्रामपंचायत येथील असंख्य कार्यकर्ते, श्री उल्हासशेठ भुर्के यांच्या समवेत व वकील अमोलराजे बांदल पाटील यांच्या समवेत खालापूर तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी व शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्हा उपाद्यक्ष सौ. कोयल कन्हेरीकर यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी कडाव ग्रामपंचायत हद्दीतील कडाव, टाकवे येथील ग्रामस्थ, वावळोली ग्रामपंचायत हद्दीतील भातगाव येथील ग्रामस्थ, भालिवडी ग्रामपंचायत मधील भालीवडी, माळेवाडी, गौळवाडी येथील ग्रामस्थ, बांगारवाडी खांडस, गावंडवाडी खांडस ग्रामस्थ, साई धाम बिल्डिंग शेलु ग्रामस्थ, अंभेरपाडा खांडस, पादीरवाडी खांडस, जिते आदिवासी वाडी ग्रामस्थ, होराळे ग्रामपंचायत खालापूर ग्रामस्थ व असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.
आमदार महेंद्र थोरवे यांनी सर्वाना अवाहन कि ह्या मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकाण्यासाठी येणाऱ्या २९ तारखेला माझा उमेदवारीसाठी अर्ज भरण्यासाठी मोठ्या संखेने वाजत गाजत आपण आपली उपस्थिती दाखवायची आहे. जे इच्छुक दोन उमेदवार आहेत ते मातोश्रीवर जाऊन बसलेले आहेत छापा पडतोय का काटा पडतोय. कर्जत मधील जनता ही सुज्ञ जनता आहे ते विकासाला प्राधान्य देणारी जनता आहे. मी ह्या पाच वर्षामध्ये २९०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच कर्जत तालुकाप्रमुख संभाजी जगताप यांची जिल्हा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली. सुदाम पवाळी यांचे कर्जत तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. उल्हासराव भुर्के यांची जिल्हा सह संपर्क पदी नियुक्ती करण्यात आली वकील अमोलराजे बांदल पाटील यांची कर्जत खालापूर विधानसभा प्रवक्ते पदी नियुक्ती व मनीष चंद्रकांत विचारे यांची खालापूर तालुका युवासेना सहसंपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
या प्रसंगी बोलताना वकील अमोलराजे बांदल पाटील यांनी अनेक ऐतिहासिक कामे करणारा व कर्जतचे नंदनवन म्हणून ओळख निर्माण करणारा ग्रेट निधी मॅन म्हणून आमदार महेंद्र थोरवे यांची ओळख आहे. येणाऱ्या २०२४ ला पुन्हा आमदार महेंद्र थोरवे हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.
तर सुदाम पवाळी यांनी राजकारणामध्ये केव्हाही काहीही घडू शकते. मला पक्षांमध्ये प्रामाणिकपणे काम करायचे आहे यापुढे कर्जत मतदारसंघात मी व माझ्या सहकाऱ्यांच्या जोरावर आमदार महेंद्र थोरवे यांना एक नंबर ने निवडून आणणार असा शब्द दिला. जे विरोधक माझ्यावर टीका करत आहे त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय मी शांत बसणार आहे. मला शिवसेना पक्षांमध्ये आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे मी मनस्वी आभार मानतो असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रम प्रसंगी रायगड जिल्हा प्रमुख संतोष भोईर, जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील,जेष्ठ नेते हनुमंत पिंगळे,उप जिल्हा प्रमुख भाई गायकर, विधानसभा संघटक शिवराम बदे, कर्जत तालुका प्रमुख संभाजी जगताप,खालापूर तालुका प्रमु .संदेश पाटील, युवा सेना तालुका अधिकारी अमर मिसाळ, महिला आघाडी सल्लागार सुरेखा शितोळे, माजी उप सभापती मनोहर थोरवे, मनीषा थोरात आदी मान्यवर तसेच शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.