व्यक्ती विशेष: भारतातील पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांची जयंती.

64

व्यक्ती विशेष: भारतातील पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांची जयंती.

व्यक्ती विशेष: भारतातील पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांची जयंती.
व्यक्ती विशेष: भारतातील पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांची जयंती.

लेखक: प्रशांत जगताप✒
कार्यकारी संपादक मिडिया वार्ता न्युज

डॉ. रखमाबाई जनार्दन राऊत सावे [जन्म 22 नोव्हेंबर 1864, मृत्यू 25 डिसेंबर 1955] या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर ज्यांनी आयुष्यभर रूग्णसेवा केली.

आपण पहिल्या भारतीय महिला डॉक्टर म्हणून आनंदीबाई गोपाळ जोशी यांचं नाव घेतलं जातं. त्यांचं धैर्य, त्यांचा त्याग आणि त्यांचं वैद्यकिय शिक्षण मोलाचंच. दु:खाची गोष्ट अशी की डॉक्टर होऊन परदेशातून भारतात परत येतानाच डॉ. आनंदीबाई आजारी पडल्या. भारतात येऊन एकही पेशंट त्या तपासू शकल्या नाहीत. 3 महिन्यातच वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी त्यांचं दु:खद निधन झालं. [डॉ. आनंदीबाई जोशी, जन्म 31 मार्च 1865- निधन 27 फेब्रुवारी 1887

भारतीय समाज व्यवस्थेत स्त्रियांना कधीही सन्मानाची वागणूक मिळाली नाही. हे धगधगणारे वास्तव आहे. त्यांना प्रत्येक स्थिकानी जातीवाद, धर्माचा ठेकेदार, पुरुषी अहंकार यांनी कायम दुय्यम स्थान दिले. चातुर्वण्र्य समाज व्यवस्था आणि तत्कालीन समाजिक व्यवस्थेने महिलांचे पूर्णपणे शोषण केले गेले. एक महिला फक्त चूल आणि मूल हेच तिच्या नशिबी आले; परंतु अशाही प्रतिकूल परिस्थितीत त्या काळात प्रचलित चालीरीतींचा हल्लाबोल करून महाराष्ट्रात अत्यंत संघर्षमय जीवन जगत सावित्रीबाई फुले यांनी स्त्री सुधारणेचा, स्त्री शिक्षणाचा पाया घातला आणि स्त्री जीवनाच्या शिल्पकार झाल्या.

समाज धर्म आणि विशेषत: त्या काळातील बुद्धिवादी तथाकथित प्रतिष्ठांच्या विरोधाला न जुमानता परदेशात जावून उच्च वैद्यकीय शिक्षण घेणा-या डॉ. रखमाबाई जनार्दन राऊत सावे या अनेक पहलुतुन एक महान अशी डॉक्टर विरागना दिसून येते.

आपण पहिल्या भारतीय महिला डॉक्टर म्हणून आनंदीबाई गोपाळ जोशी यांचं नाव घेतलं जातं. त्यांचं धैर्य, त्यांचा त्याग आणि त्यांचं वैद्यकिय शिक्षण मोलाचंच. दु:खाची गोष्ट अशी की डॉक्टर होऊन परदेशातून भारतात परत येतानाच डॉ. आनंदीबाई आजारी पडल्या. भारतात येऊन एकही पेशंट त्या तपासू शकल्या नाहीत. 3 महिन्यातच वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी त्यांचं दु:खद निधन झालं. [डॉ. आनंदीबाई जोशी, जन्म 31 मार्च 1865- निधन 27 फेब्रुवारी 1887. पण त्यांच्याच काळात समाजाचा विरोध पत्करून शिक्षण घेणा-या रखमाबाई राऊत यांचा सर्वानाच परिचय असेल असे नाही. किंबहुना त्यांचा विशेष कुणालाही परिचय नाही, असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही.

रखमाबाई राऊत यांचे जीवनही असेच संघर्षमय होते. त्या काळात परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेतले. त्याबरोबरच त्यांनी वैद्यकीय शिक्षणाला पूरक अशा अनेक बाबीही आत्मसात केल्या.
१८६४ मध्ये रखमाबाईंचा जन्म झाला. वडिलांच्या निधनानंतर त्या हरिचंद्र चौधरी यांच्याकडे आजोळी आल्या. हरिचंद्र सुधारणावादी होते. त्यांनी रखमाबाईच्या आईचा म्हणजे जयंतीबाईंचा मुंबईतील डॉ. सखाराम राऊत यांच्याशी विवाह लावून दिला. राऊत स्वत: ग्रांटमेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. त्यांनी रखमाबाईंचाही स्वीकार केला. त्यामुळे रखमाबाईंचे आडनाव सानेऐवजी राऊत झाले. त्या काळच्या समाजरितीप्रमाणे रखमाबाईंचा विवाह नवव्या वर्षी दादाजी ठाकूर यांच्याशी झाला. रखमाबाई वयात आल्यावर सासरी जाण्याची वेळ आली तेव्हा मला उच्च शिक्षण घ्यायचंय म्हणून मी नांदायला जाणार नाही अशी भुमिका घेतली. त्यांनी त्या काळात पतीकडे जाण्यास स्पष्ट नकार दिला आणि त्यांच्या संघर्षमय जीवनाचा प्रारंभ झाला नवरा दादाजी न्यायालयात गेला. रखमाबाई केस हरल्या. उच्च न्यायालयात अपिल करण्यात आल्यावरही त्या परत हरल्या. न्यायालयाने त्यांना नांदायला जा नाहीतर न्यायालयाची बेआदबी केली म्हणून तुरूंगात जा असा कडक पवित्रा घेतला. त्या तुरूंगात जायला तयार झाल्या. त्यावेळी इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांनी हा खटला प्रीव्ही कौन्सिलसमोर नव्याने चालवण्याचे ठरवले. पण न्यायालयाबाहेर पती आणि डॉ. रखमाबाई मध्ये तडजोड झाली.

डॉ. रखमाबाई सावे राऊत यांच्या स्त्रीहक्कांच्या इतिहासात हा खटला त्यावेळी जगभर गाजला आणि तरिही आजची स्त्री चळवळ आणि वैद्यकविश्व डॉ. रखमाबाई साळवेंना विसरून गेले. हे खुप दुखद बाब आहे.

हा वाद मिटल्यावर रखमाबाई वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेल्या. तेथे लंडन स्कूल ऑफ वुमन या कॉलेजात प्रवेश घेतला. प्रक्टिकल, शवविछेदन, अनेस्थिया, मिड्विफ्री, स्त्री-रोगतज्ज्ञ, दंत चिकित्सा, बाळंतपणातील शस्त्रक्रिया या प्रकारचे शिक्षण निरनिराळ्या महाविद्यालयांतून पूर्ण केले. नंतर जॉयन्ट बोर्ड ऑफ द कॉलेज ऑफ फिजिशियन अ‍ॅण्ड सर्जन ऑफ एडिनबरो येथून पदवी घेऊन 1894 मध्ये त्या भारतात परत आल्या.

डॉ. रखमाबाईंनी मुंबईतील कामा हॉस्पिटलपासून त्यांच्या वैद्यकीय कामाची सुरुवात केली. काही काळ त्यांनी गुजरातमध्येही काम केले. विशेषत: गुजरातमधील प्लेगच्या साथीत खूप महत्त्वाची कामगिरी बजावली. त्याबद्दल त्यांना तत्कालीन सरकारने ‘कैसर ए हिंद’ बहुमानाने सन्मानित केले.

डॉ. रखमाबाई अनेक वर्ष गोर गरीब जनतेची सेवा देऊन सन 1917 मध्ये नोकरीतून निवृत्त झाल्या तरी स्वस्थ बसल्या नाहीत. त्यांनी स्त्रियांमधील अंधश्रद्धा, विधवा स्त्रियांसाठी ‘वनिता’ आश्रमाची स्थापना केली. रखमाबाई शेवटपर्यंत महिलांच्या हक्कासाठी झटत राहिल्या. वयाच्या 92 व्या वर्षी या ख-या रुग्णसेविकेचे निर्वाण झाले.

असंख्य अडचणींना तोंड देत वैद्यकिय शिक्षण घेऊन त्या ज्ञानाचा उपयोग भारतीयांना आयुष्यभर करून देणार्‍या डॉ. रखमाबाई जनार्दन सावे यांना आपण सारे का बरं विसरलो? त्या आयुष्यभर प्रॅक्टीस करणार्‍या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर असूनही सरकार आणि समाज यांच्यालेखी नाही चिरा नाही पणती? अगदी महिला चळवळीलासुद्धा त्यांचा विसर का पडावा?

सुमारे दिडशे वर्षांपुर्वी मुंबईत जन्माला आलेल्या आणि 91 वर्षांचं दिर्घायुष्य लाभलेल्या डॉ. रखमाबाई जनार्दन राऊत सावे यांना सरकार आणि समाज म्हणून आपण चक्क विसरून गेलो. त्या कर्तव्यवान महिला डॉक्टरच नाव पण नाही हे येथल्या महिला समाजाच एक दुर्दव्य म्हणावे लागेल. भारतात ज्यांच्यामागे त्यांची जात उभी नसते त्यांना कोणीच वाली नसतं का?

डॉ. रखमाबाई जनार्दन राऊत सावे या महान रुग्ण सेविकेला आणि संघर्षमय जीवनाला जयंती निमित्ताने मिडिया वार्ता न्युज तर्फे विनम्र अभिवादन!