चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी,राजुरा तालुक्यात रेतीची तस्करी जोमात : प्रशासन कोमात घाटातून आणि नाल्यांमधून रेतीची अवैध वाहतूक सुरू, जेसीबी आणि रोजंदारांकडून उत्खनन

50

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी,राजुरा तालुक्यात रेतीची तस्करी जोमात : प्रशासन कोमात

घाटातून आणि नाल्यांमधून रेतीची अवैध वाहतूक सुरू, जेसीबी आणि रोजंदारांकडून उत्खनन

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी,राजुरा तालुक्यात रेतीची तस्करी जोमात : प्रशासन कोमात घाटातून आणि नाल्यांमधून रेतीची अवैध वाहतूक सुरू, जेसीबी आणि रोजंदारांकडून उत्खनन
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी,राजुरा तालुक्यात रेतीची तस्करी जोमात : प्रशासन कोमात
घाटातून आणि नाल्यांमधून रेतीची अवैध वाहतूक सुरू, जेसीबी आणि रोजंदारांकडून उत्खनन

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी:- तालुक्यातील, फुर्डी हेटी,येनबोथला, शिवणी,धाबा आणि राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन जवळील खांबाडा,ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या नदीपात्रातील रेती घाटातून व नाल्यातून रात्रपाळीला जेसीबीने मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन करण्यात येत आहे.
शासनाने काही दिवसांपूर्वी घाटाचे रीतसर लिलाव केले. यामध्ये मनुष्यबळाद्वारे रेती उपसा करणे गरजेचे असल्याचे आदेशात म्हटले आहे. परंतु रेती माफिया आता चक्क जेसीबी व पोकलेनचा वापर करून रात्रपाळीला ट्रॅक्टर तसेच दहाचाकी,सहाचाकी वाहना मार्फत मोठ्या प्रमाणात वाहतूक करीत असताना निदर्शनास येत आहे.
संबंधीत घाटांमध्ये रेतीसाठा मोठ्या प्रमाणात आहे. याचाच फायदा घेत रेती माफियांनी रातोरात श्रीमंत होण्याची शक्कल लढवून वाहने जाण्याकरिता रेती घाटातून रस्ता तयार केला आहे.आणि रेतीचे उत्खनन करून ट्रॅक्टर, हायवा अश्या वाहनाने रेतीची तस्करी करत आहेत. यामध्ये मोठी वाहने रात्रपाळीला जात असून साधारणत: ८ ते१० ट्रॅक्टर आणि हायवा रेती घाटात उभ्या असलेल्या दिसून येतात. यासंदर्भात प्रशासनाला माहिती असून देखील कुठलीही कारवाई अद्यापही करण्यात आलेली नाही. त्यामुळे रेती माफियांना प्रशासनाचे अभय असल्याचे आता जनमानसामध्ये बोलले जात आहे. एकीकडे तहसील प्रशासना मार्फत यापूर्वी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. यात एक लाखापर्यंतचा दंड बऱ्याच ट्रॅक्टर मालकांनी शासनाला भरून दिलेला आहे. अश्या प्रकारे मोठा महसूल शासन दरबारी जमा करण्यात आला. परंतु आता तशी स्थिती उरली नसल्याने तस्कर निडर होऊन सर्रासपणे रेती तस्करी करीत आहेत. रात्री बे रात्री ट्रॅक्टर, हायवा सारखे वाहने कर्कश आवाजात धुमाकूळ घालत असतात तरी देखील शासनाच्या नजरेत हे कसे येत नाही.हा एक संशोधनाचा विषय आहे.

*महसूल अधिकारी गप्प का?*
तहसीलदार,मंडल अधिकारी, तलाठी गप्प का असा सवाल आता नागरिक करीत आहे. एकीकडे जड आणि ईतर अवैध वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई करायची आणि दुसरीकडे रेती भरून येणाऱ्या ट्रॅक्टर, हायवा गाड्यांना सूट द्यायची असा प्रकार राजरोसपणे गोंडपिपरी आणि राजुरा तालुक्यात सुरू आहे. यामुळे नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चेला आता उधाण येत असून तस्करांची संबंधीत विभागा सोबत आर्थिक देवाण-घेवानीचे हित संबंध तर नाही?असे बोलले जात आहे.
*रात्रीस खेळ चाले…*
दिवसभर रेती उत्खनन बंद ठेवून रेती घाट आणि नाल्यांच्या नजीक झुडपांमध्ये जेसीबी दडवून ठेवली जाते.अशी प्राथमिक माहिती आहे. रात्रपाळीला गोंडपीपरी तालुक्यातील फुर्डी हेटी, शिवणी,धाबा,येनबोथला,तर राजुरा तालुक्यातील खांबाडा नाल्याच्या पात्रातून रेतीचा उपसा करून विरूर स्टेशन वरून सोनुरली, भेंडाळा, बोरगाव, कवठाळा, लक्कडकोड, मार्गे वेग वेगळ्या ठिकाणी हायवा,ट्रॅक्टर मार्फत रेती पुरवली जात आहे. यामुळे शासनाचे मोठे आर्थिक नुकसान होत असून नदीपात्रात रेतीचा उपसा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.तरी महसूल विभाग मुग गिळुन गप्प आहे.रेती घाटामध्ये जेसीबी पोकलेनद्वारे उत्खनन करणे नियमबाह्य आहे.रेतीच्या माध्यमाने असलेली संपत्ती देशोधडीला लावण्याचे काम रेती माफिया करीत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन रेती तस्करांवर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.