संयुक्त महाराष्ट्रातील चळवळीतील हुतात्म्यांना महाराष्ट्र संरक्षण संघटनेकडून आदरांजली

मीडिया वार्ता न्यूज
मुंबई : -रविवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२१* रोजी हुतात्मा दिवसाचे औचित्य साधून *महाराष्ट्र संरक्षण संघटना* संलग्न *मी मराठी एकीकरण समिती* तर्फे दर वर्षी प्रमाणे यंदा देखील हुतात्मा स्मारक, फोर्ट, मुंबई येथे *संयुक्त* *महाराष्ट्र* *चळवळीतील* हुतात्म्यांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
कालच्या कार्यक्रमात हुतात्मा दिना निमित्ताने संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. धर्मेंद्र घाग साहेब, श्री. लहू साळवी साहेब, श्री. मुकुंद गावडे आणि श्री. ननावरे साहेब ह्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या वेळची मुंबईची परिस्थिती आणि आताची मुंबईची परिस्थिती ह्यात किती फरक निर्माण झाला आहे. मराठी भाषेवर आणि मराठी माणसांवर होणारे अन्याय, महाराष्ट्रात हिंदी भाषेचं वाढतं अतिक्रमण ह्या संबंधित काही मुद्दे मांडण्यात आले. १०७ हुतात्म्यांचं रक्त सांडून आपण मुंबई मिळवली पण दुर्दैवाने आजही असं म्हणावं लागतंय की *महाराष्ट्रात* *मुंबई* *आहे* *पण* *मुंबईत* *महाराष्ट्र* *दिसत* *नाही*.
देशभरातून नोकरी धंद्यासाठी अमराठी लोकांचे जथ्थेच्या जथ्थे मुंबईत धडकत आहेत आणि या गर्दीत मराठी माणूस हरवला जातोय. नोकरी व्यवसायात मराठी तरुणांचे प्रमाण कमी होत आहे, दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा वापर कमी होत चालला आहे. हिंदीच्या अतिक्रमणाचं हेच लोण आता मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पसरत चाललं आहे.
मराठी भाषा संस्कृती टिकली तरच मराठी माणूस टिकेल, आणि मराठी माणूस टिकला तरच मुंबई महाराष्ट्र टिकेल. मराठी भाषा, संस्कृती टिकवणं, मराठी माणसाचं अस्तित्व टिकवणं ही मराठी माणसाचीच जबाबदारी आहे, किंबहुना ते त्यांचं कर्तव्यच आहे.
हुतात्मा दिनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना आदरांजली वाहून या कर्तव्याची जाणीव मराठी माणसाच्या मनात निर्माण व्हावी म्हणून एक छोटासा प्रयत्न करण्यात आला.
ह्या कार्यक्रमादरम्यान संघटनेचे कार्याध्यक्ष श्री धर्मेंद्र घाग, श्री. अमर कदम, श्री. अमोल रणदिवे, श्री. रवींद्र कुवेसकर श्री. मंदार नार्वेकर, श्री.श्रीकांत मयेकर, श्री. लहू साळवी, श्री. केतन वेदक, श्री. अजय कदम, श्री. आशिष बोरघरे, श्री. ननावरे साहेब आदी पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.