तालुक्यात शिवसेनेच्या माध्यमातून आरोग्य शिबिराची सुरवात
शहरातील शिवाजी वार्डात 250 रुग्णांची तपासणी

शहरातील शिवाजी वार्डात 250 रुग्णांची तपासणी
खुशाल सूर्यवंशी
राजुरा शहर ग्रामीण
प्रतीनीधी
8378848427
जन सेवा हीच ईश्वरसेवा या माध्यमातून शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने,शिवसेना जिल्हा प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात आणि शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात शिवसेना, युवासेना, महिला आघाडी राजुऱ्याच्या वतीने आयोजित केलेल्या नेत्रातपासणी शिबीर आणि आरोग्य शिबिराची सुरवात शिवाजी वॉर्ड राजुरा येथून करण्यात आली.
वॉर्डातील शिवसैनिक खुशाल उर्फ मोनू सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे नियोजन करून वॉर्डातील 250 नागरिकांना या शिबिराचा लाभ मिडवून दिला.
या शिबिराचे आयोजक तालुका प्रमुख वासुदेव चापले, तालुका समन्वयक प्रदीप येनूरकर,शहर प्रमुख निलेश गंपावार,युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, उपतालुका प्रमुख रमेश झाडे,शहर समन्वयक बबलू चव्हाण यावेळी उपस्थित होते.