तुळस विवाह सोहळा संपन्न झाल्या बरोबर एक वनरक्षक अडकला लग्नाच्या बेडीत
संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थान धाबा येथे आज दिनांक 22 नोव्हेंबर रोजी झाला संपन्न
आधी कर्तव्य नंतर लग्न अश्या कर्तृत्ववान वनरक्षकाचा विवाह सोहळा संपन्न

संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थान धाबा येथे आज दिनांक 22 नोव्हेंबर रोजी झाला संपन्न
आधी कर्तव्य नंतर लग्न अश्या कर्तृत्ववान वनरक्षकाचा विवाह सोहळा संपन्न
राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी / धाबा :- गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगांव येथील एका शेतकऱ्यांचा मुलगा वनरक्षक झाला तो पहीले जिवती येथे वनरक्षक म्हणुन कार्यरत होता त्यानंतर गेले दोन ते तीन महिने झाले ते वनरक्षक चंद्रपूर ताडोबा येथे वनरक्षक म्हणुन कार्यरत आहेत त्या वनरक्षकाचे नाव पत्रु विलास कावडे मु डोंगरगांव असे आहे सविस्तर वृत्त असे की त्या वनरक्षकाचे लग्न गेल्या दिड ते दोन वर्षे झाली जुळुन होते पण कोरोना काळ आला आणि गेले दोन वर्षे लोटली त्यामुळे त्या वनरक्षकाचे लग्न त्यांनी स्वतः होऊन आधी दिवटी नंतर लग्न म्हणुन थांबवले आणी आज दिनांक 22 नोव्हेंबर रोजी संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थान धाबा येथे विवाह सोहळा संपन्न झाला