ब्रह्मपुरी शहरात संघर्ष वाहिनी रॅलीचे भव्य स्वागत

क्रिष्णा वैद्य
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
9545462500
ब्रम्हपुरी :-
दिनांक 21. 11 .2020 ला ब्रह्मपुरी शहरात सायंकाळी *संघर्ष वाहिनीचे* आगमन झाले त्यावेळी ब्रह्मपुरी शहरातील ढिवर समाज बांधवांतर्फे रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले.
नंतर लगेच डाॅ.प्रशांत मेश्राम यांच्या व्हॅली कन्स्ट्रक्शन च्या हाॅल मध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यात संघर्ष वाहिनीचे संचालक श्री.दिनानाथ वाघमारे यांनी मागासवर्गीय आरक्षणावर मार्गदर्शन व N.T. समाजाची सद्याची स्थिती याविषयी माहिती दिली.
श्री. उमेशजी कोराम यांनी विद्यार्थी संघटनेविषयी तसेच विद्यार्थ्यांच्या समस्या व त्यावरील उपाय योजना, मागासवर्गीय होस्टेल करिता निधीची उपलब्धता याविषयी मार्गदर्शन केले तसेच श्री. धीरजजी भिसिकर यांनी शिक्षण क्षेत्रातील कार्य, याविषयी विविध शाळांचे खाजगीकरण होऊ नये म्हणून प्रयत्न, शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे बंद पडलेल्या शाळा सुरू करण्याचे प्रयत्न याविषयी सुरू असलेले कार्य याविषयी मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमात श्री.हरबाज भाई शब्बारी व अविनाश धोंडे संघर्ष वाहिनीचे कार्यकर्ते यांची उपस्थिती होती सदर कार्यक्रमाचे संचालन श्री. प्रमोदजी दिघोरे यांनी केले तर आभार श्री. आनंदजी शिवरकर यांनी मानले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता समाजातील अनेक बांधवांनी उपस्थिती दर्शविली त्यात प्रामुख्याने श्री यशवंतजी दिघोरे, डॉक्टर प्रशांतजी मेश्राम, डॉक्टर हिरालाल मेश्राम, श्री. शेळके सर, श्री. अमोलजी भानारकर , श्री. स्वप्नील अलगदेवे, श्री.अनिल पचारे, ओबीसी समाजाचे प्रतिनिधी श्री. महेशजी भर्रे व काही विद्यार्थी व इतर समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.