राष्ट्रवादी च्या बालेकिल्ल्यात भाजप प्रवेश करणार!
रोहा तालुक्यात पाच ग्रामपंचायती च्या निवडणुकीची रणधुमाळी सुर…
शहानवाज युनुस मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो.7972420502
रोहा: तालुक्यातील पाच ग्रामपंचायती च्या निवडणुका जाहीर झाल्या आसुन येत्या १८ डिसेंबर रोजी या पाच ग्रामपंचायती साठी मतदान आसुन २० डिसेंबर रोजी मतमोजणी होउन निकाल घोषित होणार आहे.
या पाच ग्रामपंचायती साठी रोहा तालुक्यात सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरुआहे, निवडणूकी च्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस चा बालेकिल्ला आसणाऱ्या रोहा तालुक्यात भाजप प्रवेश करणार आसल्याने निवडणूक मोठ्या चुरशीची ठरणार आहे.
रोहा तालुक्यात पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरुझाली आसुन इच्छुकांची उमेदवारी साठी धावपळ सुरुआहे. खा.सुनील तटकरे,अमदार अनिकेत तटकरे,अमदार अदिती तटकरे यांच्या राष्ट्रवादी बालेकिल्ल्यात शेकापक्ष नंतर भाजप सुध्दा ताकत लावणार आहे. माजी आमदार अवधूत तटकरे यांच्या भाजप प्रवेशा मुळे तालुक्यात राजकीय गणिते बदलणार का हे या निवडणूकीच्या निकालानंतर पहावयास मिळेल.
रोहा तालुक्यात तळवली तर्फे अष्टमी ७ सदस्य,पुई ७ सदस्य,पहुर ७ सदस्य,दापोली ७ सदस्य,खैरेखुर्द ९ सदस्य असे एकुण ३७ सदस्यांसाठी लढत होणार असून सोबतच थेट सरपंचाची लढत होणार आहे.
१८ डिसेंबर रोजी मतदान तर २० डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे.
सध्यातरी या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी व शेकापक्ष वर्चस्व ठेवून आहे.
या निवडणूकी मध्ये भाजप प्रवेश करणार आहे. दापोली व खैरेखुर्द या ग्रामपंचायती अलिबाग विधान सभा मतदार संघात येत आसलेने या ग्रामपंचायती कडे शेकापक्षाचे माजी आमदार श्री.पंडित शेठ पाटील व शिंदे गटाचे अलिबाग चे अमदार महेंद्र दळवी हे दोन्ही नेते या दोन ग्रामपंचायतीवर जातीने लक्ष ठेवून आहेत. या ग्रामपंचायती साठी शिंदे गट निवडणूक रिंगणात उतरणार आसुन विशेष लक्ष भाजप कडे आहे.
तसेच खैरेखुर्द ग्रामपंचायत चे माजी सदस्य व राष्ट्रवादी चे खंबीर कार्यकर्ते श्री बशीर शेठ धनसे हे स्वत सरपंच उमेदवारी लढविण्यास इच्छुक आसल्याने या निवडणुकीत भाजप कोणती करामत करेल हे पाहण्यास मिळणार आहे.