प्रा. प्रतिभा पैलवान यांना भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड २०२२ जाहीर

43

प्रा. प्रतिभा पैलवान यांना भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड २०२२ जाहीर

प्रा. प्रतिभा पैलवान यांना भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड २०२२ जाहीर

 

पूनम पाटगावे
जोगेश्वरी मुंबई प्रतिनिधी
मो. नं. – ८१४९७३४३८५

जोगेश्वरी :- कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील या कन्या महाविद्यालयातील मराठी विभागात कार्यरत असणाऱ्या कवयित्री प्रा. प्रतिभा भारत पैलवान यांना संविधान दिनाच्या निमित्ताने दिला जाणारा भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड २०२२ नुकताच जाहीर झाला आहे. लोकसभा सदस्य खासदार नवनीत राणा यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या संविधान सन्मान दिवस समारोह समितीच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार मानाचा समजला जातो. २६ नोव्हेंबर हा संपूर्ण भारतात “संविधान दिन” म्हणून विविध उपक्रमानी साजरा केला जातो. आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत भारताचे संविधान आणि त्यासंर्भात शिक्षक, प्राध्यापकांसाठी देशपातळीवर विविध उपक्रम राबविले जातात. त्या उपक्रमाचा एक भाग आई प्रा. प्रतिभा भारत पैलवान यांनी गेल्या वर्षभर केलेल्या कामाचा आढावा घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रा. प्रतिभा पैलवान यांचे साहित्य, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान आहे. त्यांचे ‘रित्या ओंजळीत माझ्या’ आणि ‘तुझी माझी मैत्रवेल’ हे कवितासंग्रह प्रकाशित आहेत, तसेच ‘पद्मरत्न २०२२’ या दिवाळी अंकाचे सहसंपादक म्हणूनही त्यांनी काम पहिले आहे. ‘एका उमालत्या कळीचा अंत….. रागिणी’ ही त्यांच्या महाविद्यालयाच्या एका प्रतिभाशाली विद्यार्थिनीची स्मरणीकाही त्यांनी प्रकाशित केली आहे. इतरही अनेक प्रोजेक्टवर त्यांचे काम सुरु आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारासाठी समाजातील सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
गोल्ड मेडल, काचपेटीतील लेखणीचे सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या २६ नोव्हेंबरला ’संविधान दिन’ च्या दिवशी नवी दिल्ली येथील न्यू महाराष्ट्र सदन, येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.