नेते उच्चशिक्षीत असावेत!

अंकुश शिंगाडे

मो: ९३७३३५९४५०

अलीकडे कोणीही नेता बनायला तयार होत नाही. कारण नेत्यांना आज नेत्यांनीच बदनाम केलेलं आहे. आजचा तो नेता जरी चांगल्या स्वभावाचा असेल, तरी त्याला बदनाम केलं जातं. कारण आज त्याला दागच तसा लागलेला आहे. तो दाग यासाठी लागतो. कारण एक काळ असतो, त्या नेत्यांच्या जीवनाकीव की त्याचेजवळ त्याच्या पुर्वकाळात कोणतीही मालमत्ता नसते. परंतू तो नेता जसजसा मोठा होतो, तसतसं त्याच्या आयुष्यात त्याची मालमत्ता वाढत जाते. ती मालमत्ता एवढी वाढते की ती त्याने कोठून आणली हा विचारच येतो.

पूर्वीचे नेते असे नव्हते. नेते हे आपल्या देशासाठी काम करीत. ते सुधारणावादी होते. अमाप संपत्ती गोळा करणे हा त्यांचा उद्देश नव्हता. तर समाजाची सुधारणा झाली पाहिजे हा त्यांचा उद्देश होता. ते शिकलेले होते. बरेचसे नेते कायदेपंडीत होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात सुधारणाही केल्या. कोणी सतीप्रथा बंद केली. कोणी विधवा विवाह सुरु केला. कोणी बालविवाह बंद केला तर कोणी मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरु केल्या. त्यांनी फक्त समाजाची सेवा करणे हा उद्देश ठेवला. 

आजचे नेते असे नाहीत. तसेच ते जास्त शिकलेलेही नाहीत. त्यातच बरेचसे नेते गुंडप्रवृत्तीचे आहेत. त्यांना देशात कोणता आणि कसा विकास करावा त्याचं साधं गणित समजत नाही. त्यांना फक्त पैसा कसा कमवायचा हे नक्कीच समजतं. त्यांंना ते गुंड प्रवृत्तीचे असल्याने कोणाचे तोंड कसे बंद करायचे हे सारं समजतं. ध्येयधोरणं कशी आखावी याचा विचारच नसतो त्यांच्या मनात. कारण ते शिकलेले नसतात.

नेते गुंडप्रवृत्तीचे नसावेत. ते सुधारणावादी असावेत. त्या त्या क्षेत्राचं त्यांना ज्ञान असावं. तसेच त्या नेत्यांनी भरपूर शिक्षण घेतलेलं असावं. विशेष सांगायचं झाल्यास नेता बनायला डिग्री किंवा समकक्ष पदवीची अट असावीच. पक्षाने वा सरकारने कोणालाही तिकीट देवू नये अशीच नेत्यांची आखणी करावी. जेणेकरुन अशी जर आखणी केली गेली तर तो त्या पदाला नक्कीच न्याय देवू शकेल व तो उच्च स्तरावर सुधारणाही घडवून आणेल. एवढंच नाही तर असा उच्चशिक्षीत नेता समाजालाच नाही तर देशालाही उच्च पातळीवर नेवून ठेवेल हे सांगायला नको.

आजच्या काळात नेते बदनाम झाले आहेत. त्यातच देशही बदनाम झालेला आहे. कोणी कोणी नेते भ्रष्टाचारात सापडलेले आहेत. तर कोणी नेते बँकघोटाळ्यात. अख्ख्या बँकाच्या बँका बुडवून टाकल्या आहेत या नेत्यांनी. कित्येक नेत्यांचा पैसा हा विदेशी बँकेत आहे. त्यांच्याजवळ एवढा पैसा आहे की जणू त्यांच्या सातपिढ्या बसून खातील. त्यांचा इतिहास जर पाहिला तर एके काळात त्यांचेजवळ काहीही नव्हतं. मग एवढा गलेलठ्ठ पैसा आला कोठून हा विचार येतो.

आजच्या नेत्यांना देशाच्या विकासाशी काही घेणंदेणं नाही. त्यांचा उद्देश फक्त पैसा कमवणे हा असतो. पक्षही त्यांनाच तिकीट देतो. बोली बोलली जाते. कोण पक्षाला किती जास्त रक्कम देईल. मग जो जास्त रक्कम देतो, पार्टी फंड म्हणून, त्याला तिकीट दिली जाते. त्यानेळी विचार केला जात नाही की ज्याला पक्ष तिकीट देत आहे. तो किती शिकलेला आहे. त्याचे सामाजीक सुधारणेत योगदान किती आहे. तो गुन्हेगार तर नाही. त्यानं कमवलेल्या पैशाला भ्रष्टाचाराची मोहर तर नाही ना. त्याला जे खातं दुलं जातं, त्याचं ज्ञान त्याला आहे का? ह्या सर्व गोष्टी आज पाहिल्या जात नसल्यानं आज देशात नेत्यांची चांदी निर्माण झाली आहे. देश विकासाच्या क्षेत्रात पुढे जात नाही. उलट तो मागे येत आहे. 

मुख्य म्हणजे आज देशात नेते बनायचा अभ्यासक्रम नाही. नेते बनायला कोणी उच्चशिक्षीत धजत नाही. कोणीही उच्चशिक्षीत पुढे येवून सत्ता सांभाळायला तयार नाही. म्हणूनच आज जी मंडळी उच्चशिक्षीत नाहीत. त्यांच्या हाती सत्ता जाते व ते देशाचं वाटोळं करीत असतात. 

महत्वाचं म्हणजे देशातील उच्च शिकलेल्या तरुणांनी पुढं येवून नेते बनायला हवं. देशाची सत्ता हाती घ्यायला हवी. त्यासाठी सरकारनं विशेष असा अभ्सासक्रम शाळेत राबवावा. जेणेकरुन तो अभ्यासक्रम शिकून तरी उच्चशिक्षीत मंडळी नेते बनतील. नेते बनायला पुढं येतील नव्हे तर या शिक्षणातून सक्षम असं नेतृत्व देशाला मिळेल. देशात भ्रष्टाचार होणार नाही व देश विकासाच्या क्षैत्रात आघाडीवर जाईल. तो एवढा आघाडीवर जाईल की इतर देशांचे प्रतिनिधीत्व करु शकेल. हे तेव्हाच घडेल, जेव्हा देशातील नेते उच्चशिक्षीत असतील. ते जेव्हा उच्चशिक्षीत असतील, तेव्हाच ते उच्च विचारांच्या गोष्टीही करतील आणि तेव्हाच ते देशालाही उच्च स्तरावर नेण्यासाठी कार्यवाही करु शकतील.

 

मीडियावार्तावर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, भाष्य, टीका याच्याशी संपादकिय मंडळ व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.


मीडियावार्ताला ​Facebook वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा ⬇ https://www.facebook.com/MediaVartaaNews

मीडियावार्ताला Twitter वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा ⬇️

https://twitter.com/mediavartanews

मीडियावार्ताच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा ⬇️ https://youtube.com/channel/UCz0eOP5ZTqqtvQ0iU0IF9hg

मीडियावार्ताला इंस्टाग्रामवर फॉलो करण्यासाठी क्लिक करा ⬇️ https://www.instagram.com/mediavartanews/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here