विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी जिल्ह्यात ६९.०० टक्के मतदान

रत्नाकर पाटील

रायगड ब्यूरो चीफ: ९४२०३२५९९३

अलिबाग: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. यामध्ये जिल्ह्यात सरासरी- ६९.१५ टक्के मतदान झाले आहे.

जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :188-पनवेल या मतदारसंघामध्ये टक्केवारी 58.63 इतकी आहे. 189-कर्जत या मतदारसंघामध्ये टक्केवारी 75.30 इतकी आहे. 190-उरण या मतदारसंघामध्ये टक्केवारी 76.80 इतकी आहे. 191-पेण या मतदारसंघामध्ये टक्केवारी 73.02 इतकी आहे. 192-अलिबाग या मतदारसंघामध्ये टक्केवारी 77.15 इतकी आहे. 193-श्रीवर्धन या मतदारसंघामध्ये टक्केवारी, 194-महाड या मतदारसंघामध्ये टक्केवारी 71.53 इतकी आहे.

जिल्ह्यात 85+ वरील मतदारांची मतदारसंघ निहाय आकडेवारी पुढील प्रमाणे आहे :- 188-पनवेल 124, 189-कर्जत 158, 190-उरण 66, 191-पेण 545, 192-अलिबाग 443, 193-श्रीवर्धन 423, 194-महाड 571 अशा एकूण 2 हजार 330 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

जिल्ह्यात दिव्यांग मतदारांची मतदारसंघ निहाय आकडेवारी पुढील प्रमाणे आहे :- 188-पनवेल 13, 189-कर्जत 17, 190-उरण 16, 191-पेण 58, 192-अलिबाग 27, 193-श्रीवर्धन 107, 194-महाड 113 अशा एकूण 351 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.   

 जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी निवडणूकीसाठी नियुक्त असलेल्या शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पोस्टलद्वारे केलेल्या मतदानाची मतदारसंघ निहाय आकडेवारी पुढील प्रमाणे आहे :- 188-पनवेल 2 हजार 388, 189-कर्जत 1 हजार 202, 190-उरण 1 हजार 009, 191-पेण 1 हजार 270, 192-अलिबाग 1 हजार 552, 193-श्रीवर्धन 1 हाजर 226, 194-महाड 1301 अशा एकूण 9 हजार 948 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.  

 जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेतील मतदारांची मतदारसंघ निहाय आकडेवारी पुढील प्रमाणे आहे :- 188-पनवेल 35, 194-महाड 5 अशा एकूण 40 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here